
ओरिसा भुवनेश्वर येथे लिंगराज मंदिरात गणेशाची एक अत्यंत भव्य आणि सुरेख मूर्ती आहे. हा गणेश शिवाची पार्श्वदेवता म्हणून आहे. तो चतुर्भुज नागोपवीत आहे. ही मूर्ती अर्धनृत्यावस्थेतील आहे. तिच्या डाव्या पायातील घोटय़ावर फणा काढलेला नाग आहे. याचप्रमाणे पुरीच्या सुप्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात अजाननाथ गणेश आहे. थोडं पुढे गेल्यावर वटवृक्षाच्या खाली सिद्धगणेशाचे मंदिर आहे. खंडगिरी येथील अतिप्राचीन लेण्यांमध्ये गणेशगुंफा हे लेणे आहे. या गुहेच्या पायर्यांच्या दुतर्फा दोन मोठे हत्ती कोरलेले आहेत.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply