नवीन लेखन...

ओळख…

रमेश विजयची वाट पाहात हॉटेलात एका टेबलावर बसलाय…वेटर जवळ येऊन मेनू कार्ड देतो विजय तो तसाच समोर ठेवत एक चहा आणायला सांगतो, चहा पिता – पिता रमेश समोर च्या टेबलावर बसलेल्या सुंदर तरुणीकडे पाहात असतो ती तरूणीही मधे – मधे चोरून त्याच्याकडे पाहात असते इतक्यात रमेश समोरून येताना दिसतो त्याला पाहून विजय जागेवर उटून उभा राहतो तो जवळ येताच त्याला प्रेमाने अलिंगन देतो आणि समोरच्या खुर्चीवर बसायला सांगतो….

रमेशः वेटर ! ( वेटर जवळ येताच )

विजयः दो प्लेट मेंदू वडा और उसके बाद दोन चहा ! ( वेटर निघून गेल्यावर…रमेशचा हात हातात घेत विजय ) किती वर्षांनी भेटतोय ना आपण ?  अरे तुमच्या रूम एस. आर.ए. मध्ये गेल्या होत्या ना झाली का बिल्डींग ?

रमेशः हो झाली आणि आम्ही शिफ्ट पण झालो एकदाचे चार वर्षे भाड्याच्या घरात राहून जीव नकोसा झाला होता. चार वर्षे कोणत्यातरी तुरुंगात शिक्षा भोगत होतो की काय असं वाटत होत मला.

विजयः का रे ?

रमेशः तुला माहीत आहे लहानपणापासून स्वतःच्या मालकीचा घरात हवं तसं, हवं तेंव्हा आणि हवे तेवढे पाय पसरून राहण्याची सवय त्यामुळे भाड्याच्या घरात राहिलो त्या दरम्यान कोणाशी नव्याने मैत्री केली नाही की संवाद केला नाही कारण संवाद झाला तरच विसंवाद होतो. माझी ओळखही कोणाला कळू दिली नाही. आपल्या शेजारी चार वर्षे एक मोठा लेखक राहात होता हे आता पुढे मागे कधी तरी कळेल त्यांना ! आता स्वतःच्या मालकीच्या घरात राहायला गेल्यावर माझा आत्मा शांत झाला.

विजयः मग आता कसं वाटतय झोपडीतून टॉवरमध्ये राहायला गेल्यावर

रमेशः फार काही बदल झालाय असं मला वाटत नाही फक्त आमची आडवी चाळ आता उभी झालेय असं वाटतंय इतकच !

विजयः आता बोललास एखाद्या  लेखकासारखा आता तुझ्यातील लेखक बोलायला लागलाय वटत ! पण मी एका लेखकाला नाही मझ्या मित्राला भेटायला आलोय.

रमेशः मी लेखक नंतर अगोदर तुझा मित्र आहे बरं ! बाकी वहीनी, आई आणि तुझी पोरं कशी   आहेत ?

विजयः सगळे मजेत आहेत. आई सध्या  गावी आहे अधून – मधून येते मुंबईला… बाबा गेल्यापासून ती जास्त गावालाच असते. तिथल्या वातावरणात तिची तब्बेत बरी असते. बरं तू लग्न कधी  करतोयस ? आई विचारत होती ? तुझ्या लग्नाची तिलाही फार काळजी आहे.

रमेशः उगाच लग्न करून देशाच्या लोकसंख्येत भर घालण्याचा माझा विचार नाही बर !

विजयः लोकसंख्या नको वाढवू पण लग्न तर कर…

रमेशः लोक लग्न का करतात ? आपला वंश पुढे वाढावा म्ह्णून !  मला नाही वाटत की आपला वंश पुढे वाढता आणि आपलं असं कोणत सालं राजा महाराज्यांच घराण आहे.

विजयः ते ठिक आहे पण आयुष्यभर एकटा राहाणार आहेस का ? म्हातारपणी कोणी साबतीला कोणी नको का ?

रमेशः म्हातारपण कोणी पाहीलय आणि जिच्याशी मी लग्न करेन ती मला अर्धवट सोडून जाणारच नाही याची खात्री कोण कोण देणार आहे का ?

विजयः बरं बाबा तू लग्नच करू नकोस ब्रम्हचारी रहा, सन्यास घे आणि एका मटाची स्थापना कर  म्ह्णजे निदान आंम्ही आमच्या म्हातारपणी हरी- हरी करायला त्या मटात येऊ.

रमेशः ब्रम्हचारी मी आहेच आणि आता सन्याशीही झालोय आणि आपला समाज हाच माझा मट आहे या समाजातच राहून मला समाजासाठी कार्य करायचयं…

विजयः आपण शाळेत असताना कोणाला स्वप्नातही वाटल नव्हतं की एक दिवस तू इतका मोठा लेखक होशील.

रमेशः मला तरी कोठे वाटलं होत पण मला वाटत माझा जन्मच लेखक होण्यासाठी झाला असावा.

विजयः तुला असं का वाटतं ?

रमेशः लहानपणापासून माझी एक मैत्रीण होती मनिषा नावाची. तिच्या आईची मी तिच्याशी लग्न करावं अशी खूप इच्छा होती. एक दिवस तिने मला विचारल तुला मोठा होऊन कोण व्हायचयं ? तेंव्हा माझ्या तोंडून अगदी सहज निघून गेल लेखक ! तिच्या आईला ते माझं दिवाळस्वप्न वाटल. मनिषा वयात आल्यावर तिच्या आईने मला तिच्याशी लग्न करतो का म्ह्णून विचारणा केली. मी स्पष्ट नकार दिला. माझ्या आयुष्यात मी एखाद्या मुलीला दिलेला तो पहिला आणि शेवटचा स्पष्ट नकार होता.  तो नकार देऊन मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा गाढवपणा केला की काय असं आता मला वाटू लागलंय. नव्हे तोच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा गाढवपणा होता.

विजयः अरे ! पण तू नकार का दिलास ? नकार देऊ नाहीतर काय करू ? आमच्या आई-बाबाने आंम्हाला फक्त जन्मच दिला होता आणखी काय दिल होत घंटा ? मला माझ्या भावंडाची काळजी वाटत होती. मला त्यांच भविष्य सुरक्षित करायचं होतं पण आज त्यांच  भविष्य सुरक्षित झालयं पण माझं भविष्य मात्र असुरक्षित झालयं !

विजयः  ते कस काय ?

रमेशः शाळेत असताना मी किती हुशार होतो तुला माहीतच आहे. मी डॉक्टर, इंजिनिअर, वकील काहीही होऊ शकलो असतो पण बारावी झाल्यावर शिक्षण सोडून मला नोकरी करावी लागली. काबाड कष्ट करून मी माझ्या बापाचं घर सावरलं आमच्या घराला गरीबीतून श्रीमंतीत आणण्यासाठी माझी वीस वर्षे खर्च झाली. या वीस वर्षात माझं स्वतःच भविष्य सुरक्षित करण्यासाठी  मला स्वतःहून चालत आलेल्या सर्व संध्या मी गमावून बसलो होतो… तुला खरं सांगू माझा नात्यांवरचा  आणि प्रेमावरचाही विश्वास आता आणि लग्नाच्या बाबतीत सांगायच तर माझ्या आयुष्यात इतक्या स्त्रिया येऊन गेल्या गेल्यात की मला आता खात्रीच वाटत नाही की त्यांच्या तोडीची एखादी स्त्री आता मला पत्नी म्ह्णून लाभेल…

विजयः बरं कविताच काय ? कधी भेटली होती का ?

रमेशः चार वर्षापूर्वी तिच लग्न झाल्याचं ऐकल होत त्यानंतर काही पत्ता नाही. कदाचित आता एखाद्या मुलाची आईही झाली असेल…बरं झालं बिचारीच आयुष्य मार्गी लागल एका मुलीचे उशिरापर्यंत कोणत्याही कारणाने लग्न न केल्यास तिला सहन न होणारा मानसिक त्रास मला कळू शकतो.

विजयः तुझी आणि तिची काय भानगड होती ?

रमेशः भानगड अशी नाही पण खरं सांगतो अगदी तीसरीत असल्यापासून ती मला आवडायची पण मला तिचा धडाडी स्वभाव, त्याची मात्र भिती वाटायची. माझं तिच्यावर प्रेम होतं पण ते शारीरिक आकर्षणातून निर्माण झालेल नव्हत. तिच जर माझ्यावर प्रेम असत आणि तिने जर मला माझ्याशी लग्न करतोस का ? अस विचारल असत तर मी नक्की तिच्याशी लग्न केल असत. आजही माझ्या मनात तिच्याबद्दल तेच प्रेम आणि तोच आदर आहे जो काल होता. माझ्या हृद्यातील तिची जागा कोणी कधीच घेऊ शकणार नाही कारण ती माझं पहील प्रेम होती.

विजयः मग तुझ्या कथेतील बाकी नायिका वास्तविक होत्या की त्या फक्त कल्पनेतून जन्माला आल्या होत्या ?

रमेशः माझ्या कथेतील एकही नायिका कल्पनेतून जन्माला आलेली नाही. प्रत्येक नायिका वास्तवात होती फक्त प्रत्येक वेळी तिचा वास्तवातीला नायक मी होतोच असे नाही.

विजयः मी तुला कधी बोललो नाही पण मला वाटत माझ्या मावस बहिण ज्योती तिच्यासोबतही तुझ काहीहीतरी चालू आहे अशी शंका मला आली होती ? मला आवडल असतं तुला माझा भावोजी करून घ्यायला, पण आता तिच लग्न होऊन ती ही तीन पोरांची आई झाली…आजही तुझी आठवण काढते कधी – कधी तिच्याही मनात तुझ्याबद्दल आजही ओलावा आहे असं जाणवत मला का कोणास जाणे.

रमेशः गालात गोड ह्सत… विजय मला माहीत होत की ज्योतीच माझ्यावर प्रेम आहे, आमच्या प्रेमाला तुझा विरोध हाणार नाही हेही मला माहीत होत, आमच्या घरातील सर्वांना ती आवडतही होती, पण तिच अल्पशिक्षीत असणं ही सगळ्यात मोठी अडचण होती. तिच्याशी लग्न करून मला स्वतःवर आणि तिच्यावरही अन्याय करायचा नव्हता. माझा मित्र या नात्याने तू मला संगितल असतस तर मी तिच्याशी लग्न करायला तयारही झालो असतो पण तू आपल्या मैत्रीला जागलास या जगात माझा एकच मित्र आहे आणि तो तू आहेस म्ह्णूनच आज पाच वर्षानंतर भेटूनही आपल्या नात्यात काहीही फरक पडलेला नाही.

विजयः मलाही वाटत होत की तुझ कोणातरी अती सुंदर आणि हुशार मुलीशी लग्न व्हावं प्रतिभासारख्या…

रमेशः प्रतिभा… ती ही झाली आता दोन पोरांची आई. तिच्यावरही माझं प्रेम होत आणि मी ही तिला आवडायला लागलो होतो पण कधी ? जेंव्हा वर्तमानपत्रात माझे फोटो छापून यायला लागले होते  तेंव्हा ! माझ्या प्रसिध्दीवर प्रेम करणारी स्त्री मला माझ्या आयुष्यात नको होती त्यामुळेच प्रसिध्दी माझ्या वाट्याला आल्यावर मी फारसा कोणा स्त्रीच्या भानगडीत पडलो नाही की कोणाच्या प्रेमात पडलो नाही आणि गुंतलो तर नाहीच. शाळेत असताना प्रतिभासाठी मी काय काय केल तुला काय सांगू…

विजयः सांग ना तिच्याबद्द्ल तू मला फारस कधीच काही सांगितला नाहीस.

रमेशः सांगतो ऐक ! ती आमच्या बाजूच्या सोसायटीत राहायची तिच्या घरासमोरून एक रस्ता जंगलात जायचा तो रस्ता जिथे संपायचा तिथे एक ओढा होता. फक्त तिला पाहता याव म्ह्णून पावसाळ्यात चार महिने मी त्या ओढ्यावर आंघोळ करायला जायचो आणि कधी- कधी कोणाला शंका येऊ नये म्हणून घरातील चादरी कपडे धुवायलाही घेऊन जायचो. म्ह्णजे तिच्यासाठी मी धोबीही झालो होतो. जाताना तिच्या घरात हमखास डोकावून पाहायचो ती दिसली की देवाच दर्शन झाल्यावर एखाद्या भक्ताला जितका आनंद होत असेल तितका आनंद मलाही व्हायचा. इतर महिन्यात ती दुपारी आमच्या सोसायटीतून विहीरीवर पाणी आणायला जायची मग मी आमच्या घरातील भरलेले हंडे रिकामे करून विहिरीवर पाणी आणायला जायचो ते नाहीच जमले तर वाटेत भर उन्हात एका बंद घराच्या उंबरट्यावर बसून तिला येता – जाताना पाहात बसायचो.  ती खूप हुशार होती त्यामुळे तिला पटवायला आपली हुशारी पुरेशी आहे असं मला वाटत होत पण ते पुरेस नव्हत कारण ती इतर बर्‍याच कलेत पारंगत होती फक्त चित्रकला आणि हस्तकला सोडली तर त्यात आमचा कोणी हात धरू शकत नव्हता. माझ्या चित्रांच्या प्रेमात पडणार्‍या बर्‍याच मुली होत्या तेंव्हा माझ्या आजु -बाजुला  पण प्रतिभा त्यात नव्हती दुदैवाने. त्यामुळे तिला पटविण्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळे करायला हवे असा विचार माझ्या मनात आला. त्यामुळे मी तिच्यासाठी एक प्रेमपत्र लिहलं ते सामन्य प्रेमपत्र नसावं म्ह्णून मी त्यात तिच्यावर एक कविता लिहण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या आयुष्यातील पहिली कविता लिहली. माझ्यातील कविला तिनेच जन्म दिला. ते पत्र तिला देण्याची काही मला हिंमत झाली नाही कारण मला वाटलं ती तिच्या आयुष्यात फार मोठी होईल इतकी मोठी की तिच्या अस्तित्वाची जगही दखल घेईल. पण तसं काहीच झालं नाही तिनेही एका सर्वसामान्य स्त्रीचाच मार्ग स्वीकारला आणि मी प्रसिध्दीचा अवघड मार्ग स्वीकारला. एका क्षणाला मी तिला जेथे पाहात होतो तिथे मीच उभा होतो आणि माझ्याजागी ती.

विजयः खरं सांग रमेश तुझ्या आयुष्यात आतापर्यंत किती स्त्रिया आल्या ?

रमेशः वीस – पंचवीस असतील…नक्की आकडा नाही सांगता येणार…

विजयः त्यातील एकीनेही तुला माझ्याशी लग्न करशील का म्ह्णून विचरणा केली नाही का ?

रमेशः नाही ना ! मला त्याच नेहमीच सर्वात जास्त आश्चर्य वाटत राहत. आजही अविवाहीत विवाहीत स्त्रिया माझ्याशी बोलायला उत्सूक असतात पण मला वाटत त्या माझ्यावर प्रेम करत नाहीत तर माझा आदर करतात.

विजयः म्ह्णजे तू लग्न का करत नाहीस याच समाधानकारक उत्तर तुझ्याकडे आजही नाही बरोबर ?

रमेशः हो !

विजयः आता जर तुझ्या आयुष्यात एखादी स्त्री आली आणि ती म्ह्णाली, ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचयं तर तू काय करशिल ?

रमेशः शक्यतो असं होणार नाही पण जर झालंच तर मी तो माझ्या नियतीचा कौल म्ह्णून मान्य करेन.

विजयः बरे ते जाऊदे ! मला सांग मगाशी तू म्ह्णालास की तुझं भविष्य सुरक्षित नाही ते कसं   काय ?

रमेशः तुला माहीत आहे मी सोळाव्या वर्षापासून नोकरी करत होतो. दहा वर्षे मी सलग नोकरी केली तेंव्हा येणारा सगळा पैसा मी माझ्या कुटुंबावर खर्च केला तेंव्हा मी स्वतःचा असा स्वतंत्र विचारच केला नाही. त्यानंतर मी माझा छंद जोपासावा म्ह्णून मी लिखाण करू लागलो त्यातूनही काही आर्थिक फायदा तर होत नव्हता उलट तोटाच होत होता त्यामुळे मागील सात-आट वर्षात काही बचत करने मला काही जमले नाही. आता आमच्या कुटुंबातील सारेच कमवते झाले आहेत त्यामुळे माझे उत्पन्न हे त्यांच्या नजरेत अत्यल्प झाले आहे. त्यामुळे माझा लिखाण करणे हा आता सर्वांनाच रिकामटेकडेपणाचा उद्योग वाटू लागला आहे. माझ्या बाबांनी तर चक्क माझ्यातील लेखकाची तुलना बेवड्याशी केली. ते मला म्ह्णाले बेवडापण घर – संसार, बायका – पोर सांभालून बेवडा पितो. ज्यांच्यासाठी मी माझ्या आयुष्यातील मला सर्वात मोल्यवान गोष्टींचा त्याग केला त्या माझ्या कुटुंबातील एकालाही माझ्यातील लेखक समजून घ्यावासा वाटला नाही याचा मला सर्वाधिक राग आला आणि मी आता स्वतःशिच विचार केला माझ्या घरातील माणसच जर मला माझ्यातील लेखकाला समजून घेऊ शकत नसतील तर परक्या घरातून आलेली ती काय मला घंटा समजून घेणार ?

विजयः याचा अर्थ असा होतो की लग्नाच्या दिशेने जाणारा तुझा मार्ग अधिक खडतर झालेला आहे.

रमेशः हो ! हे खरं आहे. आई मुलांना फक्त जन्म देते कर्म देत नाही. विजय तुला सांगतो लग्नाच्या बाबतीत माझं नशिब बदलण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण त्यातील एकालाही यश आलं नाही उलट जो माझ्या लग्नाच्या भानगडीत पडला तो माझ्यापासून दुरावला. काहीतरी माझ्यात आहे ज्यामुळे स्त्रिया माझ्याकडे आकर्षित होतात पण माझ्या प्रेमात पडत नाहीत त्यांना माझा सहवास हवा असतो पण त्यांना माझं होऊनही राहायचं नसत. त्यांना आयुष्यभर माझ्याशी मैत्रीच नात असावं असं वाटत असतं कदाचित हाच मला कोणाकडून तरी मिळालेला शाप असावा.

विजयः तू लग्न केल नाहीस याचा तुला काही त्रास होतो का ?

रमेशः त्रास ! कसला त्रास अजिबात नाही उलट मी लग्न केलं तर मला त्रास होईल अशी भिती मला सतत वाटत असते. लग्नाच नुसता विषय जरी निघाला तरी माझे मन बेचैन होते. जिच्याशी मी लग्न करावं अशी स्त्री माझ्या आयुष्यात अजून आलेलीच नाही असं मला माझं मन सतत सांगत असत. माझ्या लग्न न करण्याचा मला काहीच त्रास नाही उलट मी आनंदी आहे पण माझ्या नातलगांना आणि समाजातील इतर लोकांना उगाच वाटत राहत की माझं लग्न व्हावं. आज माझ्या लग्नाच्या बाबतीत आमच्या घरातील लोक आज जात – धर्म कशाशीही तडजोड करायला तयार आहेत कारण माझं लग्न हा आता त्यांच्या गळ्यातीला फास झाला आहे म्ह्णून ! ही तयारी जर त्यांनी दहा वर्षापूर्वी दाखवली असती तर आज चित्र वेगळ असतं. मी एक संसारी माणूस असतो जगातील सारी सुखे माझ्या पायाशी लोळ्ण घेत असती. माझ्याकडे बर्‍यापैकी लक्ष्मी असती पण सरस्वती नसती दुदैवाने…आणि मी लेखकही नसतो…

विजयः तू काहीही म्हण पण आज तुझी जी काही परिस्थिती आहे त्याला तू स्वतः जबाबदार आहेस. ती तू कधीही बदलू शकला असतास मग का नाही बदलीस?

रमेशः मला साध, सरळ आणि सोप्प जीवन जगायला आवडत नाही. सामान्य माणूस त्याच्या जीवनात जे काही करतो त्यापेक्षा वेगळ काहीतरी मला करायच असतं. सामान्य माणूस आयुष्यभर पैशाच्या मागे धावतो म्हणून मी धावलो नाही. सामान्य माणूस लग्न करून चार पोर काढण्यात धन्यता मानतो म्ह्णून मी मानत नाही. सामान्य माणूस इतरांनी त्यांच्याबाबतीत केलेल्या चुका माफ करतो पण मी करत नाही. सामान्य माणूस प्रसिध्दीसाठी झटत नाही पण मी झटतो. सामान्य माणूस समाजासाठी स्वतःला त्रास करून घेत नाही पण मी करून घेतो. सामन्य माणूस ज्या गोष्टींना मान्यता देऊ शकत नाही अशा बर्‍याच गोष्टींना मी मान्यता दिली आहे.

विजयः रमेश तू असामान्य आहेस म्ह्णूनच समाजाने तुला जगू दिला आहे नाहीतर कधीच तुझा जीव घेतला असता.

रमेशः हो ! बरोबर आहे, आपला समाज हा मुंगीच्या गतीने बदलतोय, आपल्या देशाने कितीही प्रगती केली तरी आपल्या देशातील विवाहसंस्था नष्ट होणार नाही फक्त तिच्या ओझ्याखाली दबणार्‍यांची संख्या मात्र वाढत जाईल. माझा विवाह संस्थेला विरोध नाही पण विवाह सर्वांसाठी नाही हे सत्य समाजानेही आता स्वीकारायला हवे. आपल्या देशातील कोणाचाही कोणाची चोकशी करताना चौकशीचा पहिला प्रश्न असतो, तुझं लग्न झाल का ? दुसरा – तुझं लग्न जमलयं का ? , तीसरा- लग्न कधी करणार ? , चौथा- कोणी भेटत नाही का ? पाचवा- लग्नासाठी तडजोड का करत नाही ? सहावा – काही समस्या आहे का ? सातवा- पटवून का लग्न करत नाही ? या प्रश्नांना काही अर्थ आहे का ? पण आपला सारा देश या प्रश्नाभोवती फिरतो वेड्यागत…

विजयः आपल्या देशात तशीही पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्या कमी होत चाललेय तुझ्यासारखा लग्न न करण्याचा विचार करणार्‍या पुरुषांची आपल्या देशाला आज खरंच खूप गरज आहे. नाहीतर आपल्या देशात पुन्हा महाभारत अवतरल्याशिवाय राहाणार नाही.

रमेशः विजय ! तू जरी हे विनोदाने म्ह्णत असलास तरी माझ्या दृष्टीने ही आपल्या देशातील फार मोठी समस्या आहे. लग्नासाठी उतावले असणारे असंख्य पुरुष मी माझ्या आजुबाजुला पाहातोय म्ह्णूनच मुलगी वयात आली रे आली की कोणी ना कोणी तिच्यावर टपून बसलेला असतोच. आपल्या देशातील स्त्रियांची संख्या अशीच कमी होत रहिली तर आपला समाज असंतुलीत होईल आणि समाजस्वास्थ बिघडेल. पुरुषांची स्त्रियांचा आदर करणारी नाही तर स्त्री लंपट पिढी जन्माला येईल. आज काही अंशी सुरक्षित असणारी स्त्री अधिक असुरक्षित होईल तेंव्हा.

विजयः मलाही दोन मुलगेच आहेत सूना आतापासूनच शोधायला हव्यात…

रमेशः आपल्या मुलगे आहेत याचा अभिमान बाळगण्यापेक्षा ज्यांना मुली आहेत त्यांचा सन्मान केला त्यांना मान दिला तरी ही परिस्थिती बदलेल असं मला वाटतं.

विजयः बरोबर आहे तुझं.

रमेशः आज समाजात जो काही स्वैराचार बोकाळलाय तो मला आजिबात पसंत नाही. लग्नाचा तर आज नुसता बाजार मांडलाय, लग्नाचा धंदा सुरू झालाय. माझ्या एका उदयोगपतीच्या मुलाच लग्न चार वर्षे जुळ्त नाही चार वर्षात त्याला लग्नासाठी सुयोग्य वधू मिळाली नाही. हजारो रुपये खर्च करून कोणी ते काम त्याच्यासाठी करूही शकलेले नाही त्याच्या फार अटी नसतानाही. प्रत्येक मुलीला त्याच्याकडून वेगळी अपेक्षा असते, कोणाला तो पोस्ट ग्रॅज्युएट नाही हे खटकते, कोणाला त्यांची उंची, कोणाला त्याचे वजन, कोणाला त्याचे सोशल नसण, कोणाला त्याच सुंदर दिसण, कोणाला त्याच्या आईची जात, तर कोणाला त्याच्या बाबांची दोन लग्न खटकतात. त्याच्या आयुष्यातही बर्‍याच मुली येऊन गेल्या होत्या त्यांना नाकारल्याचा आता त्याला पश्चाताप होत आहे. माझ्यात आणि त्याच्यात एकच फरक आहे तो म्ह्णजे तो लग्नासाठी उतावला झालेला आहे आणि मी नाही. त्याचे बाबा इतके मोठे उद्योगपती पण त्याच्यासाठी त्याच्या लग्नासाठी कोणतीही तडजोड करायला तयार झाले आहेत कारण त्यांना आपल्या मुलाच लग्न करून लोकांची तोंडे बंद करायची आहेत. हे बाप बेटे ऐरवी वाघासारखं जीवन जगतात पण लग्नाचा विषय म्हटला की दोघांचीही बकरी होते. आपल्या देशात झोपायला आणि प्रेम करायला जात – धर्म कोणालाही आडवा येत नाही फक्त लग्न करताना तो आडवा येतो. पत्रिका आडव्या येतात. इतर अनेक गोष्टी आडव्या आणल्या जातात…

विजयः आता जर तू लग्न करण्याचा निर्णय घेतलासच तर तुला कशी स्‍त्री पत्नी म्ह्णून अपेक्षित आहे ?

रमेशः फार काही नाही, तिला वाचनाची आवड असावी, सामाजिक जाण असावी, सर्वात महत्वाचे ती स्वार्थी नसावी, सारासार विचार करणारी असावी, संसारात फार रमणारी नसावी, स्पष्टच सांगायच तर ती सामान्य स्त्री नसावी. तिची स्वतःची अशी वेगळी ओळख असावी, ती माझ्यावर अवलंबून नसावी, एक स्वतंत्र व्यक्ती म्ह्णून सर्वार्थाने जगण्यास ती लायक असावी.

विजयः रमेश तुला खरोखरच स्वप्नातील परी हवी आहे. पण तरीही एक मित्र म्ह्णून तुला तुझ्या स्वप्नातील परी या आयुष्यात मिलो अशी मी देवाकडे प्रार्थना करेन. पण मित्रा आता तिच्याबाबतीत तडजोड मात्र करू नकोस मला ते आवडणार नाही.

रमेशः तडजोडच जर करायची असती ना विजय ! तर कधीच केली असती आता ह्त्ती आत गेलाय फक्त शेपूट बाकी आहे.

विजयः बाकी आता नवीन काय करण्याचा विचार आहे ?

रमेशः विजय तुला म्ह्णून सांगतो, आता काही काळ लिखाण बंद करून व्यावसायात लक्ष घालण्याचा मी निर्णय घेतलेला आहे कारण भरल्यापोटीच प्रवचन देणे आणि ऐकणे शक्य असते, पोट भरण्यासाठी पैसा लागतो तो मी मिळवला बर्‍यापैकी पण मी साठवला नाही आता मला तो साठवायचा आहे. समाजात दुदैवाने तू समाजासाठी किती त्याग केला आहेस यावरून तुझी किंमत हल्ली ठरत नाही. तुला मान मिळण्यासाठी तुझ्याकडे किती पैसा आहे हे महत्वाची भुमिका बजावत. फक्त पैशाच्या जोरावर किती अक्क्ल शून्य लोक मोठे लेखक म्ह्णून मिरवत असतात समाजात. मी लेखक म्ह्णून स्वतःला सिध्द केले आहे पण आता मला माझा मान हवाय आणि इतरांनाही त्यांचा मान मला मिळवून द्यायचा आहे.

विजयः याबाबतीत माझी काही मदत लागली तर मला सांग मी नक्की करेन.

रमेशः ती तू करशीलच याची मला खात्री आहे.

विजयः पण पैशाच्या मागे इतकाही धावू नकोस की त्या पैशाच्या ओझ्याखाली तुझ्यातील लेखक दबला जाईल.

रमेशः तस काहीही होणार नाही. माझ्यातील लेखकाला कोणीही विकत घेऊ शकणार नाही.

विजयः माझ्य शुभेच्छा आहेत तुझ्या पूढील वाटचालीसाठी…

रमेशः धन्यवाद ( विजयचा हात हातात घेत )

( विजयजागेवरून उटतो तो उटल्यावर रमेशही उटतो दोघ पुन्हा एकमेकांना प्रेमाने अलिंगन देतात.)

विजयः आता पुन्हा भेटू तेंव्हा कदाचित एक उद्योगपती म्ह्णून तुझी एक नवीन ओळख निर्माण झालेली असेल…चल निघूया….

( दोघे जायला निघतात… मगापासून रमेशकडे चोरून पाहणारी मुलगी त्यांच्या दिशेने येते आणि त्याला म्ह्णते सर…एक सेल्फी प्लीज )

 

— निलेश बामणे
 
202, ओमकार टॉवर, बी – विंग, गणेश मंदिरा जवळ, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर,
जन.ए.के.वैद्य मार्ग, गोरेगांव ( पूर्व ), मुंबई – 400 065.
मो. 8652065375 / 8692923310
Email- nileshbamne@yahoo.com
nileshbamne10@gmail.com

Avatar
About निलेश बामणे 419 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..