नवीन लेखन...

ओव्याचे २५ उपयोग

स्वयंपाकात उपयोग होणा-या मसाल्याला औषधी महत्व खुप असते . याचे योग्य उदाहरण म्हणचे ओवा. ओव्याचा वापर हजारो वर्षांपासुन आजारांवर घरगुती उपाय म्हणुन केला जातो. ओव्याचे वनस्पतिक नाव ट्रेकीस्पर्मम एम्माई आहे. आयुर्वेदानुसार ओवा पचनक्रीया सुधारते. हे कफ, पोट, छाती चे दुखणे आणि कीटकांचे रोगांसाठी फायदेशीर आहे. यासोबतच उचकी, ढेकर या आजारांसाठी फायदेशीर असते. ओव्यामध्ये 7 टक्के कोर्बोहायड्रेट, 21 टक्के प्रोटीन, 17 टक्के खनिज, 7 टक्के  कॅल्शियम, फॉस्फोरस, लोह, पोटॅशियम, सोडियम, रिबोफ्लोविन, थायमिन, निकोटिनिक अॅसिड कमी प्रमाणात, थोड्या प्रमाणात आयोडिन, साखर, सेपोनिन, टेनिन, केरोटिन आणि 14 टक्के तेल असते. यामध्ये मिळणारे सुगंधीत तेल 3-4 टक्के असते, 5 ते 6 टक्के मुख्य घट थाइमोल असते.

1. पोट बिघडल्यावर ओवा चावुन खावा. यानंतर एक कप गरम पाणी प्या.

2. 10 ग्रॅम सुंठ, 5 ग्रॅम काळे मीठ, 2 ग्रॅम जीरे चांगल्या प्रकारे मिश्रण करा. या मिश्रणातील 3 ग्रॅम प्रमाण कोमट पाण्यत टाकुन दिवसातुन 4-5 वेळा घ्या. पोट दुखी होणार नाही.

3. पोटात जंतु असतील तर काळ्या मीठासोबत अर्धा चमचा ओवा खा. हे काही वेळा नियमित खाल्ल्याने पोटातील जंत नष्ट होतील.

4. 3 ग्रॅम ओवा आणि अर्धा ग्रॅम मीठ खाल्ल्याने हृदयाचे रोग दुर होतील.

5. गॅस झाल्यावर थोडी हळद, ओवा आणि एक चिमुट काळे मीठ मिळवुन खा. यामुळे लवकर आराम मिळेल.

6. 5 ग्रॅम ओवा पाण्यात टाकुन सेवन करा. महिन्यातुन पाच वेळा असे केल्याने मुतखडा कधीच होणार नाही आणि असेल तर निघुन जाईल.

7. तोंडले, ओवा, अद्रक आणि कापुर यांना समान प्रमाणात घेऊन कुटून घ्या. एका सूती कपड्यात गुंडाळुन थोडे गरम करा सुजलेल्या भागावर हळु-हळू शेकल्यामुळे सुज कमी होईल.

8. दारुची सवय मोडण्यासाठी दिवसातुन प्रत्येक दोन तासाला ओवा चावण्यास द्या. लवकर परिणाम दिसेल.

9. ओवा भाजुन बारीक करा. या मिश्रणाने रोज दोन- तीन  वेळा दात घासा. तुमचे दात मजबुत आणि चमकदार होतिल. दात दुखत असल्यास ओवा पाण्यात उकळुन कोमट पाण्याने गुळण्या करा. दात दुखणे थांबेल.

10. आजवान बारीक करुन खोब-याच्या तेलात टाका आणि हे तेल कपाळावर लावा , डोके दु:खी थांबेल.

11. ओवा भाजुन एका कपड्यात गुंढाळा आणि रात्री झोपतांना उशा जवळ ठेवा, दमा, सर्दी, खोकला असणा-या लोकांना श्वास घेण्यास अडचण येणार नाही.

12. दम्याच्या रोग्यांना रोज ओवा आणि लवंगच्या समान प्रमाण असलेले चुर्ण रोज दिले तर फायदा होतो. ओवा एखाद्या मातीच्या भांड्यावर जाळुन त्याचा धुर केला तर दम्याच्या रोग्यांना श्वास घेण्यास अडचण येणार नाही.

13. ओव्याच्या रसामध्ये दोन चिमुट काळे मीठ मीळवुन सेवन करा आणि नंतर गरम पाणी प्या. खोकला बरा होईल.

14. कोरड्या खोकल्यापासुन त्रस्त असाल तर ओव्याचा रस मधात मिळवुन दिवसातुन 2 वेळा एक-एक चमचा सेवन करा.

15. गळ्यात खाज असेल तर बोराचे पाने आणि ओवा हे सोबत एकाच पाण्यात उकळा आणि गाळुन हे पाणी प्या.

16. अद्रकच्या रसामध्ये थोडे चूर्ण आणि ओवा मिळवून खाल्ल्याने खोकल्यापासुन आराम मिळेल.

17. ओवा विड्याच्या पानामध्ये ठेवून चावा. असे केल्याने कोरड्या खोकल्यापासुन आराम मिळेल. याव्यतिरिक्त ओवा खाल्ल्याने गळ्याची सूज आणि दुखणे थांबेल.

18. नाक बंद झाल्यावर ओव्याला बारीक करुन कपड्यात गुंडाळुन वास घ्या, आराम मिळेल.

19. जेवणा नंतर ओवा आणि गुळ सोबत खाल्ल्याने सर्दी आणि अॅसिडिटीपासुन आराम मिळेल.

20. 2 ते 3 ग्रॅम ओवा दिवसातुन तीन वेळा घ्या. सर्दी आणि डोकेदुखीपासुन आराम मिळेल.

21. पानच्या पाणांसोबत ओवा चावा, गॅस, पोटातील मुरडा आणि अॅसिडीटीपासुन आराम मिळेल.

22. 1 ग्रॅम भाजलेला ओवा पानमध्ये टाकुन जावल्याने अपचन पासुन आराम मिळेल. हिवाळ्यात शरिराला थोडी गर्मी देण्यासाठी थोडा ओवा चावा आणि पाण्यासोबत सेवन करा.

23. 1 चमचा ओवा आणि एक चमचा जीर एकसोबत भाजुन घ्या. मग हे पाण्यात उकळुन गाळुन घ्या. या पाण्यात साखर मिळवून प्यायल्याने अॅसिडीटीपासुन आराम मिळेल.

24. कॉलरा झाल्यावर कापुर सोबत ओवा मिळवून खाल्ल्याने आराम मिळेल. झोप न येण्याची समस्या असेल तर 2 ग्रॅम ओवा पाण्यासोबत सेवन करा. झोप चांगली येईल.

25. खाज येत असेल किंवा कुठे जळाले असेल तर, ओवा बारीक करुन तेथे लावा आणि 4-5 तास लावुन ठेवा. यामुळे फायदा होईल.

— आरोग्यदूत या WhatsApp Group वरुन 

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 118 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..