नवीन लेखन...

औद्योगिक उत्पादनात भाज्यांचे विविध उपयोग

|| हरि ॐ ||

सर्वसाधारणत: रोजच्या भाज्या तीन गटात विभागल्या जातात १) फळभाजी २) पालेभाजी ३) शेंगाभाजी वगैरे. आपण प्रत्येकजणं रोजच्या जेवणात भाज्यांचा उपयोग करतोच ज्यामध्ये पोषक द्रव्य, जीवनसत्व, प्रथिन भरपूर प्रमाणात असतात. पण काही भाज्या, कडधान्ये, तृणधान्ये, बिया वेगवेगळया जीवनोपयोगी वस्तूंमध्ये वापरण्यात येतात ज्यामुळे त्या वस्तूंचा दर्जा, प्रत, आणि एकंदरीत गुणात्मक वाढीसाठी उपयोग होतो आणि ते कसे ते आपण बघणार आहोत.

गवार शेंगाभाजी : गवार ही मुळची भारतीय वनस्पती. कमी पावसाच्या भागात येणारी गवार ओक्लाहोमा, टेक्सास, अॅरिझोना या अमेरिकन राज्यांमध्ये काही लाख हेक्टरात लावली जाते. पण तिचा मुख्य उपयोग भाजीसाठी न करता शेंगा जून होईपर्यंत झाडांवर वाढवतात. दाणे वेगळे करून शेंगांची टरफले गुरांना सकस आहार म्हणून घालतात. गवारीच्या मुळांवर नायट्रोजन शोषणारी बॅकटेरिया असतात आणि म्हणून गवार काढली की त्या जागेवर कापसाचे उत्पन्न घेतात त्यामुळे कापसाचे उत्पन्न अधिक मिळते.

गवारीचे दाणे व बियांपासून एक प्रकारचा डिंक मिळतो त्याचा उपयोग कागदाला खळ लावून चकाकी आणणे, आईस्क्रीम मध्ये वापरणे, केकच्या आयसिंगमध्ये, कापड, औषधी, उद्योग, सौंदर्यप्रसाधने, खाणकाम, अशा अनेक ठिकाणी केला जातो.

करडई : करडईच्या बियांपासून खाद्यतेल तर फुलांपासून रंगद्रव्य मिळविण्यासाठी होतो. करडईमध्ये लीनेलिक आम्ल असणारे सुधारित वाण तयार केले आहे. लीनेलिक आम्लामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढत नाही. तेलरंगात ते वापरले तर तेलरंग लवकर वळतात. करडईच्या तेलामुळे पिवळट झाक येत नाही आणि त्यासाठी ते एनॅमल वॉर्निशसाठी वापरतात.

व्हर्नेनिया : व्हर्नेनिया हे भारतीय तण अमेरिकेत मुद्दाम नेऊन त्यापासून इपोक्सी-आम्ल काढण्याचा उद्योग केला गेला आहे. कापूस आणि मका होणाऱ्या प्रदेशात ही वनस्पती नीट वाढते. व्हर्नेनिया पासून प्लॅस्टिक निर्मितीसाठी कच्चा माल मिळतो.

एरंड : मुळची आफ्रिकन एरंड आता भारतीय बनली आहे. एरंडीच्या तेलाच्या उत्पादनात भारताचा प्रमुख वाटा आहे. शास्त्रज्ञांनी जास्त तेल देणारी नी बुटकी आणि यांत्रिकीकरणास सोपी अशी जात निर्माण केली. एरंडीमुळे, येणारी अलर्जी टाळणं, त्यामुळे शक्य झालं आहे. औषधी गुणधर्म, उच्च दर्जाचं वंगण आणि इतरही अनेक उपयोग एरंडीच्या तेलात आहेत.

जगदीश पटवर्धन

— जगदीश पटवर्धन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..