वाळ्याला गरीबांचा A.C. म्हणतात. या बहुगुणी वाळ्याचा विशेषत: उन्हाळ्यात खूप उपयोग होतो.
Chrysopogon zizanioides हे शास्त्रीय नाव असलेले Vetiver grass म्हणजेच वाळा, ज्याचा मूळ उगम आपल्या भारतातच आहे. वाळ्याला बेना, बाला, मुदीवाळा, कुरुवेल, सुगंधी-मूलक, उशीर, खर, बेकनम्, कसक्युकस ग्रास, व्हेटिव्हेरिया झिझॅनॉईडिस अशी अनेक नावं आहेत. विशेषत: पश्चिम आणि उत्तर भारतात “खस गवत” ह्या नावाने परिचीत असलेले हे गवत. वाळा या गवता या बहुवर्षायू गवताची उगवण दाट होते. हे गवत मृद्संधारणासाठी अतिशय चांगले आहे. लागवड स्लिप्स’पासून केली जाते. पिवळा वाळा, काळा वाळा असे वाळ्याचे दोन प्रकार आहेत. गवती बांध या तंत्रामध्ये समपातळीत उतारास आडवे मातीचे बांध टाकण्याऐवजी वनस्पतीची लागवड केली जाते व त्याचा बांधासारखा उपयोग करता येतो. याकरिता प्रामुख्याने मारवेल-८, मद्रास अंजन, खस गवत आणि सुबाभूळ अशा वनस्पतींची निवड करतात. उन्हाळ्यात माठात वाळा टाकल्यास पाण्याला मस्त सुगंध येतो आणि पाण्यातील दोष निघून जाण्यासही मदत होते. वाळ्याच्या मुळांच्या दोन जुड्या तयार कराव्यात. एक जुडी पिण्याच्या पाण्यामध्ये घालावी आणि दुसरी उन्हात वाळत ठेवावी. दुसर्याड दिवशी उन्हात वाळवलेली जुडी पिण्याच्या पाण्यात आणि पाण्यातील जुडी उन्हात ठेवावी. याप्रमाणे दररोज करावं. हे वाळ्याचे पाणी उष्णतेचे विकार दूर करणारे आहे. तसेच हे पाणी थंड व सुगंधी होते. त्या पाण्याने तहान भागते. वाळ्याचे पडदे करून त्यावर पाणी मारलं तर सभोवती गारवा वाटतो. म्हणूनच उन्हाळ्यात अनेक ठिकाणी वाळ्याचे पडदे लावण्याची पारंपरिक प्रथा आपल्याकडे आहे. वाळा हा अतिशय थंड आहे. अंगाची आग होणे, अंगातील उष्णता यावर वाळ्याचे चूर्ण घ्यावे. लघवीच्या, किडनीच्या आजारांवर वाळ्याचा चांगला उपयोग होतो. लघवीला आग, जळजळ होणे, लघवीचे प्रमाण कमी होणे यावर वाळ्याचा उत्तम उपयोग होतो. मुलांचा घोळाणा फुटणे, विशेषत: उन्हाळ्यात काही मुलांना हा त्रास खूप होतो. यावर वाळ्यापासून तयार केलेले ‘उशीरासव’ इतर औषधांबरोबर वापरतात. घामोळ्या, अंगावर पित्त येणे त्वचेवर लाल चट्टे येणे यावर वाळ्याच्या चूर्णाचा लेप लावतात. त्वचारोग, त्वचेची आग होणे, त्वचेची आग होणे, तारुण्यपिटीका यासाठी वाळा चूर्णाचा इतर चूर्णांबरोबर वापर करतात. त्यामुळे त्वचा टवटवीत होते. अंगाला घाम जास्त येत असल्यास, घामाला दुर्गंधी येत असल्यास वाळ्याचे चूर्ण अंगाला लावावे. खूप ताप, विशेषत: उन्हाळ्यातील ताप तसेच रक्तपित्त, त्वचेखाली रक्तस्त्राव यावर वैद्यांच्या सल्ल्याने वाळ्याचा उपयोग करतावा. वाळा अत्तर म्हणजेच खसचं अत्तर. वाळ्याचा वास मनाला उल्हसित करतो, आपल्या संवेदनकेंद्रांना चेतना देतो. त्यामुळे आपल्याला सुगंधाचं ज्ञान होतं. वाळ्याचं चूर्ण अंगाला चोळलं तर त्वचेचा दाह कमी होतो. घामाचं नियंत्रण होतं आणि घामाची दुर्गंधीही कमी होते. चूर्ण पाण्याबरोबर पोटात घेतलं तर “तृषा’ शमते आणि पोटातली कडकी कमी होते. वाळ्याचे तेल बाजारात ८ ते १०००० रुपये किलो दराने विकले जाते. वाळ्याचे तेल उध्र्वपातन पद्धतीने काढताना खूपच काळजी घ्यावी लागते. नैसर्गिक सुगंधी तेल हे अनेक रासायनिक पदार्थाचे मिश्रण असते. यातल्या प्रत्येक पदार्थाचा उत्कलन बिंदू विशिष्ट असतो व इतरांपेक्षा भिन्न असतो. तसेच त्यांच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटी (सापेक्ष घनता)मध्येही फरक असतो. ऑईल सेपरेटरद्वारे तेल व पाणी वेगळे करताना जर पाण्यापेक्षा सुगंधी तेल जड असले तर ते तेल भांडय़ाच्या तळाशी राहते व हलके असले तर पाण्यावर तरंगते. वाळ्याच्या तेलाची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी .९९० ते १.०३२ असते. उध्र्वपातन प्रक्रियेने वाळ्याचे तेल काढण्याची प्रक्रिया सुरू केल्यावर सुरुवातीला येणारे वाळ्याच्या तेलातील काही घटक हे पाण्यावर तरंगतात तर नंतर येणारे काही घटक हे पाण्यापेक्षा जड असल्याने भांडय़ाच्या तळाशी राहतात. बाजारात वाळा मिळतो. छोट्या शहरांमध्ये तर मिळतोच पण पुण्या मुंबईलाही मिळतो. काष्ठौषधी असलेल्या दुकानात नक्की मिळतो.
वाळ्याचे औषधी उपयोग
वाळ्यामध्ये शीत, तृष्णाशामक, मुत्रल हे मुख्य गुणधर्म आहेत. मुळांचे चूर्ण थंड, उत्तेजक व मुत्रल आहे.
वाळा पित्त व कफनाशक तसेच दुर्गंधीनाशक असून दमा, खोकला, उचकी, रक्तरोग, उलटी, तहान, हृदयरोग, मूत्ररोग, लघवीची आग, अंगाचा दाह, व्रण आणि ज्वर या विकारांवर उपयुक्त आहे. वाळा जाळून धुरी घेतल्यास तीव्र डोकेदुखी कमी होते. उन्हाळी लागल्यास वाळा चूर्ण पाण्यात उकळून थंड झाल्यावर घेतल्यास आराम मिळतो. थकवा कमी करण्यासाठी वाळा सरबत उत्तम आहे. उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी वाळ्याच्या पडद्यांचा उपयोग करतात.
वाळ्याचे तेल, अत्तरे, सौंदर्य प्रसाधने व खाद्य पदार्थात वापरतात. वाळ्यात रंगद्रव्ये, आयर्न ऑक्साेईड, आम्ल चुन्याचे प्रमाण असते. वाळ्याचे सरबत तर हिरव्या रंगामुळे व थंड गुणामुळे उपयोगी आहे.
चंदन वाळा सरबत.
साहित्य. चंदन पूड पाच ग्रॅम, वाळा पावडर पाच ग्रॅम, पाणी 50 मि.लि., साखर 100 ग्रॅम.
कृती. पाणी उकळलेल्या पाण्यात चंदन व वाळा पावडर टाकून दोन तास झाकून ठेवावी. नंतर चमच्याने ढवळून गाळून किती होते ते मोजावे. एक वाटी मिश्रणास दोन वाटी साखर व एक वाटी पाणी याप्रमाणे घ्यावे. पाणी व साखर एकत्र उकळून फेस शांत झाला आणि मिश्रण स्वच्छ दिसू लागले, की गॅस बंद करून त्यात चंदन-वाळ्याचं तयार केलेलं मिश्रण घालून चांगलं चमचाने ढवळून गाळणीने गाळून बाटलीमध्ये भरून ठेवावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ- इंटरनेट
कुठं मिळतील solapur madhe
सर,
पुण्यात वाळ्याचे पडदे कुठे मिळतात? तसे ते मुंबईत मिळत।त का?
sumantayade14350@gmail.com