नवीन लेखन...

औषधी शेती, विकासाला गती..!

  औषधी शेती हा पर्याय आर्थिक उन्नतीमध्ये महत्वाचा निर्णय ठरत आहे.जागतिक बाजारपेठेचा विचार करता भारतीयांना फायद्याचा ठरेल असा पर्याय आहे. अलोपेथिक औषधांचे दुष्परिणाम पाहता आज जग आयुर्वेदिक औषधांकडे आकृष्ट होत आहे.आयुर्वेदामध्ये परिणामकारक तसेच शरीराला पोषक अशी औषधी मोठ्या प्रमाणात आहेत.गेल्या दहा वर्षामध्ये आयुर्वेदाचा वापर आणि विश्वास पाच पटीने वाढला

आहे.परिणामकारक विश्वसनीय औषधी बनविणाऱ्या प्रतीष्टानांची संख्या वाढल्याने औषधी वनस्पतीची मागणी वाढली आहे. शेतकऱ्यांनी औषधीशेती केल्यास मोठा फायदा मिळवता येईल.तुळस,काळमेघ,गुळवेल,अश्वगंधा,वेखंड,शतावर,पिंपळी,जेष्टमध कोरफड,पंढरी मुसळी,नागरमोथा,पाषाणभेद,गुग्गुळ,अडुळसा, अग्निशिखा,आवळा,बेहडा,हिरडा,वाळा,काळी हळद,अगस्त,पुनर्नवा, गोखरू, कडूनिंब याप्रकारच्या कितीतरी औषधी वनस्पती कमी पाण्यावर उत्पादित करता येतात.काही वनस्पती आंतरपिकासारख्या घेता येतात.शेतात सावलीसाठी औषधी वनस्पतीच्या झाडांची लागवड करता येते.यामुळे उत्पन्नात वाढ होईल.कोणतीही औषधी बनविताना झाडेच वापरावी लागतात,ती झाडे आपल्या शेतात उत्पादित करता आली तर जागतिक बाजारपेठेतला पैसा आपल्या देशात वळविता येईल.आपल्याला आपली परंपरागत शेती पद्धती बदलून आता औषधीकडे जाणे गरजेचे झाले आहे.आदिवासी क्षेत्रात राहणाऱ्या लोकामाधेही याबाबत जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.जगात जेवढी मागणी औषधी वनस्पतींना आहे तेवढ्या प्रमाणात त्या उपलब्ध नाहीत.यामुळे काही वनस्पतीच्या जाती नामशेष होण्याचीही शक्यता आहे.ते संकट आपल्या दाराशी येऊ नये,पर्यावरणाची हानी होऊ नये तसेच आपल्या वनस्पती आपल्याला बेभाव किमतीला विकत घेण्याची पाळी येऊ नये.या बाबींचाही विचार करण्याची गरज आज आली आहे.औषधी शेती करताना जर आपल्याला ती मोठ्या प्र
माणात फायदेशीर सेल व अन्य फायदे असतील तर आता विचार केलाच पाहिजे……

— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..