कधी-काळी आपणच तर भेटलो होतो
प्रेमाच्या नाजूक पण घातक त्या वळणावर
घेतल्या होत्याच की शपथा ही प्रेमाने
एकमेकांवर प्रेम करण्याच्या आयुष्यभर
अहंकार मधेच तो कधीतरी दुखावला
ठरताच वरचढ स्वप्ने तुझी माझ्या स्वप्नांवर
त्याग कोणी करावा प्रश्न निर्माण होता मी
सोडलं पाणी माझ्या तुझ्यावरील प्रेमावर
दुरावा वाढत जात अंतरही वाढत गेल
बळी गेला आपल्या प्रेमाचा आपल्या ध्येयावर
आलो जेव्हा आपण अपघाताने समोर
विसंबून होतो तव दुसर्यांच्या प्रेमावर
कवी – निलेश बामणे
— निलेश बामणे
Leave a Reply