त्रिगुणात्मक ती आदी शक्ती, कोल्हापूर वासिनी स्मारावी सकलानी निशिदिनी ।।धृ।।
रत्नशिलेवरी महालक्ष्मी लावण्याची प्रथा पाठीशी सिंह असे तो ऊभा।धरितसे मातुलींग फल ते दक्षिणकरी ती गदा शोभते वरचेकरी ते पानपात्र अन् खेटक डाव्याकरी अखंड
छाया धरी शेष तो, शिरी छत्र वानुनी ऐसे दैवत नच त्रिभुवनी ।।१।।
कुरळकेश ते आंबा सोडी पाठीवर मोकळे श्रीमख अधिकचि तेजाळलेनवरत्नांचा मुकुट मस्तकी अंबेने घातला तेजे लोपावी रवि -राशीलानेसली अंबिका श्वेतांबर भरजरी शोभते लालसर कुमकुम भालावरीकनकाचे त्याली अभूषण तनुवरी विश्वमोहिनी विष्णूकान्ता कमला नारायणीदिसतसे शुभदा तेजस्विनी ।।२।।
मंगलमूर्ती सिद्धीविनायक आसनस्थ सन्मुखा आरंभी दर्शन ते भाविकादक्षिणभागी भवभयहारिणी वसे महाकालिका वामी ती विधीची प्रियकन्यकाते द्वारपाल जय विजय पुढे तिष्ठती श्रीयंत्र जवळची साक्षात त्रिपुरेश्वरीतीशिरोभागी वसती शंकर गिरिआपती सुरवर वंदित अशी जगदंबा, नित्य पहा लोचनी मनी वसो माता सुखदायिनी ।।३।।
त्रकाल आरती गायन भक्ती, नित्य तिथे चालती भक्तजन श्रद्धेने रंगती ।दक्षिण काशी शक्तिपीठ ते, दिगंत अशी ख्याती महिमा वर्णावा तो किती ।हे दुरित दुर्जना दान संहारिणी रक्षणार्थ भक्ता नाना रुपधारिणीहे भक्त वत्सले प्रेमामृत वर्णिणी हरुनी आपदा, देई संपदा, सकलांना जीवनी करी कृपा देवी वरदायिनी ।।४।।
— किशोर रामचंद्र करवडे
Leave a Reply