फार पूर्वी रशियात घडलेली ही एक गोष्ट आहे. त्या वेळी रशियावर निकोलस नावाचा राजा राज्य करीत होता. आपल्या सीमेचे रक्षण करण्यासाठी त्याने ठिकठिकाणी सैनिक तैनात केले होते. अशाच एका अतिशय दुर्गम भागातील एका छावणीत एक सैनिक पहारा देत बसला होता. परंतु तो केवळ नावालाच पहारा द्यायला बसला होता. असे म्हणावे लागेल कारण त्याचे अजिबात लक्ष नव्हते. त्याच्या डोक्याला एक फार मोठी चिंता भेडसावत होती. त्या सैनिकाला एक आई व चार बहिणी होत्या. आपल्या बहिणी सुखात राहाव्यात म्हणून कर्ज काढून त्याने त्यांची लग्रे लावून दिली होती. आता हे एवढे मोठे कर्जकसे फेडायचे याचीच त्याला चिंता लागून राहिली होती. शिवाय आपल्या मूळ गावापासून तो बराच लांब होता. त्यामुळे कर्जदार आपल्या आईला सतावतील याही भीतीने तो खूपच अस्वस्थ होता. आपल्याला कोणाकोणाचेकिती किती कर्ज आहे याची त्याने यादीच तयार केली. ती यादी त्याने पुन्हा एकदा वाचूनपाहिली व त्याखाली ‘ आता हे कर्ज कोण आणि कधी फेडणार ?’ असे त्याने लिहून ठेवले. थोड्या वेळाने पहारा देत असतानाच त्याला गाढ झोप लागली. नेमक्या त्याच वेळेला निकोलस राजा सीमावर्ती प्रदेशात आला होता. तो त्या मार्गावरून जात असताना त्याला आपल्या या सैनिकाची छावणी दिसली म्हणून तो तेथे आला. त्याने पाहिले आपला एक सैनिक गाढ झोपी गेला आहे व शेजारी एक कागद पडला. उत्सुकता म्हणून त्याने तो कागद पाहिला. सैनिकाने लिहिलेली ती कर्जाची यादी व त्याच्या खाली ‘हे कर्ज कोण आणि कधी फेडणार’ हे त्याने वाचले व त्याच्याखाली ‘निकोलस’ असे लिहून व आपली स्वाक्षरी करून तो .आला तसाच निघून गेला. थोड्या वेळाने त्या सैनिकाला जाग आली. जवळच पडलेला कागद उचलून त्याने आपल्या कर्जाची यादी पुन्हा वाचायला सुरुवात केली व खाली जेव्हा ‘निकोलस’ चे नाव व स्वाक्षरी त्याने पाहिली, त्या वेळी त्याचा विश्वासच बसला नाही. काही दिवसांनी त्याला कर्ज फेडीसाठी सरकारी खजिन्यातून रक्कम मिळाली व तो कर्जमुक्त झाला. एका कर्तव्यदक्ष राजामुळे त्याच्या मनातील मोठी चिंता दूर झाली होती.
Be the first to comment
महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य
राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत
अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...
अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर
अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
Leave a Reply