मराठी कवयित्री, गीतकार, बालसाहित्यकार, नाटककार वंदना विटणकर या मुंबईतील बालनाट्यनिर्मिती करणाऱ्या ’वंदना थिएटर्स’च्याही संचालिका होत्या.
त्यांनी बालरंगभूमीसाठी लिहिलेली रॉबिनहूड, टिमटिम टिंबू बमबम बगडम, बजरबट्टू इत्यादी बालनाट्ये गाजली. त्यांच्या रॉबिनहूड या नाटकातून शिवाजी साटम, विलास गुर्जर, मेधा जांबोटकर, विजय गोखले, विनय येडेकर अशा अनेक कलाकारांनी रंगभूमीवर पर्दापण केले.
वंदना विटणकर यांनी प्रेमगीते, भक्तीगीते, कोळीगीते, बालगीते अशी ७०० हून अधिक गाणी व सुमारे १५०० कविता लिहिल्या आहेत. अरूण पौडवाल, अनिल मोहिले, सुधीर फडके, श्रीकांत ठाकरे, श्रीनिवास खळे अशा संगीतकारांनी त्यांच्या गीतांना चाली दिल्या असून सुलोचना चव्हाण, प्रभा अत्रे, शोभा गुर्टू, जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर, मोहम्मद रफी, हेमंतकुमार, आशा भोसले अशा नामवंत गायकांनी गायली आहेत. मा.वंदना विटणकर यांचा पहिला विवाह चित्रकार चंद्रकांत विटणकर यांच्याशी झाला होता. मा.चंद्रकांत विटणकरांच्या निधनानंतर १९८६ साली त्यांनी किशोर पनवेलकर यांच्याशी पुनर्विवाह केला होता.
वंदना विटणकर यांचे ३१ डिसेंबर २०११ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मा.वंदना विटणकर यांची लोकप्रिय गीते
खेळ कुणाला दैवाचा कळला
नाते जुळले मनाशी
मी प्रेम नगरचा राजा
परिकथेतील राजकुमारा
राणी तुझ्या नजरेने नजरबंदी केली गं
आज तुजसाठी या पावलांना
अधिर याद तुझी जाळीतसे रे दिलवरा
हा रुसवा सोड सखे
हे मना आज कोणी
अगं पोरी संबाल दर्याला
तुझे सर्वरंगी रूप
शोधिसी मानवा राऊळी मंदिरी
खेळ तुझा न्यारा
Leave a Reply