नवीन लेखन...

कांदा साठवा, भाव मिळवा



अलीकडे चातुर्मासातही कांदे खाणार्‍यांची संख्या मोठी असते. त्यामुळे थंडीच्या दिवसात कांद्याला अधिक मागणी प्राप्त होते तसेच त्याला दरही चांगला मिळतो. पण या हंगामात किंवा अन्य वेळी बाजारात अनुकूल परिस्थिती असताना कांदा बाजारात आणायचा तर त्याची योग्य साठवणूक व्हायला हवी. या बाबीकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे खराब झालेला कांदा अक्षरश: रस्त्यावर फेकून देण्याची वेळ उत्पादकांवर येते.कांदा हा सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनातील गरजेची बाब झाला आहे. रोजच्या जेवणात कांद्याचा मुबलक वापर करणार्‍या कुटुंबांचे प्रमाण कमी नाही. ग्रामीण भागात तर कांद्याचा वापर बहुतेक सर्व पदार्थात मोठ्या प्रमाणावर केला जातो. मग अशा तोंडाला चव आणणार्‍या कांद्याचे भाव कडाडल्याने सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले नाही तरच नवल. कांद्याचे औषधी गुणधर्म हेसुध्दा त्याच्या वाढत्या वापरामागील महत्त्वाचे कारण आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेल्या कांद्याच्या उत्पादनाबद्दल, त्याच्या बाजारपेठेबद्दल मात्र सर्वसामान्यांना फारशी माहिती नसते. वास्तविक भारतात होणार्‍या एकूण कांद्याच्या उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा मोलाचा आहे. कांद्याच्या एकूण उत्पादनापैकी 25 ते 30 टक्के उत्पादन महाराष्ट्रातून होते. शिवाय कांद्याच्या एकूण निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा 80 ते 85 टक्के इतका आहे.राज्यातील कांद्याच्या एकूण उत्पादनापैकी खरीप हंगामात 10 ते 15 टक्के, हंगामानंतर 30 ते 40 टक्के तर रब्बी किंवा उन्हाळ्याच्या हंगामात 50 ते 60 टक्के कांद्याचे उत्पादन होते. असे असले तरी कांद्याच्या साठवणुकीबाबत योग्य ती दक्षता बाळगायला हवी. कारण योग्य साठवणुकी अभावी कांदा मोठ्या प्रमाणावर वाया जात असल्याचे दिसते. आपल्याकडे शेतमालाच्या य

ग्य साठवणुकीबाबत बर्‍याच अंशी उदासिनता दिसते. त्यामुळे बाजारात पोहोचलेला माल ताजा असत नाही. तर बर्‍याच वेळा त्याचा दर्जा खालावलेला असतो. अशा मालाला योग्य

किंवा अधिक किंमत मिळणे शक्य होत नाही. यात अंतिमत: शेतकर्‍यांचेच नुकसान होत असते. त्यामुळे शेतकर्‍यांनी शेतमालाच्या

साठवणुकीवर अधिक लक्ष केंद्रीत करायला हवे आहे.अन्य पिकांच्या मानाने कांद्याची साठवणुक अधिक जोखमीची ठरते. त्यामुळे याबाबत शास्त्रशुध्द माहिती अवगत असायला हवी. सर्वसाधारणपणे खरीप किवा त्या हंगामानंतर उत्पादित करण्यात आलेला कांदा साठवणुकीसाठी फारसा योग्य नसतो. मात्र, उन्हाळ्यात अर्थात रब्बी हंगामात उत्पादित करण्यात आलेला कांदा पाच ते सहा महिन्यांपर्यंत साठवून ठेवता येतो आणि पावसाळ्याच्या हंगामात म्हणजे जून ते ऑक्टोबरपर्यंत बाजारपेठेत तो उपलब्ध करून देता येतो. याचे कारण पावसाळ्यात कांद्याची आवक थंडावलेली असते. परिणामी त्याचे भाव चढे राहतात. याचा फायदा घेऊन या हंगामात बाजारात कांदा आणल्यास चांगला आर्थिक फायदा मिळवता येतो. पूर्वी कांदा उघड्यावर सुकवला जात असे. शिवाय अधुनमधून तो खालीवर केला जात असे. अर्थात अलीकडे तापमान बदलामुळे कांद्याच्या साठवणुकीसाठी पोषक वातावरण राहिलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे कांद्याची शास्त्रोक्त पध्दतीने साठवण गरजेची ठरते. हे लक्षात घेऊन नाबार्डच्या मदतीने कांद्याच्या साठवणुकीची केंद्रे उभारण्यात आली आहेत. शिवाय शेतकर्‍यांना आधुनिक पध्दतीच्या कांदा साठवणुकीबाबत मार्गदर्शन केले जात आहे. त्यातून विविध ठिकाणी शास्त्रोक्त पध्दतीने कांद्याच्या गोदामांची उभारणी केली जात आहे. या पध्दतीचे राजगुरुनगरमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने विकसित केलेले कांद्याचे गोदाम आदर्श ठरायला हरकत नाही. या पध्दतीतील साठवणुकीत कांद्याच
कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेतली जाते. शिवाय यात कांद्याची गुणवत्ता कोणत्याही परिस्थितीत घटणार नाही यासाठी विशेष तंत्र वापरण्यात आले आहे. कांदा उत्पादक शेतकर्‍यांना कांद्याची योग्य किंमत मिळावी हा या मागचा उद्देश असतो.असे असले तरी कांद्याच्या साठवणुकीत काही समस्याही आहेत. साठवणुकीनंतर कांद्याचे वजन घटणे ही त्यातील महत्त्वाची समस्या समजली जाते. साठवणुकीनंतर कांदा चांगला वाळल्याने त्याचे वजन कमी होते. त्यामुळे तो वजनात अधिक बसतो. त्यामानाने ओला कांदा कमी बसतो. यातील फायद्या-तोट्याचे गणित लक्षात घेतल्यास ओला कांदा विकणे उत्पादकांना केव्हाही फायदेशीर वाटणे साहजिक आहे. पण असा कांदा लवकर खराब होत असल्याने त्याची खरेदी करणार्‍या ग्राहकांची संख्या तुलनेने कमी आहे. भाज्यांच्या साठवणुकीची योग्य व्यवस्था असणारे ग्राहक ओल्या कांद्याची खरेदी करतात. हॉटेल व्यावसायिकांनाही असा कांदा चालतो. असे असले तरी योग्य साठवणुकीच्या कांद्याला बारमाही चांगली मागणी असते ही बाब विसरता कामा नये.अलीकडे शेतमालाचे भाव सतत बदलत आहेत. आजची स्थिती उद्या नसते असे चित्र दिसते. अशा वेळी शेतमालाच्या भावाचा अंदाज कसा बांधायचा हा प्रश्न असतो. वास्तविक कोणताही शेतमाल बाजारात आणण्यापूर्वी तेथील स्थितीचा अंदाज घेतला जातो. एखाद्या मालाचे भाव चढे असतील तर तो लवकरात लवकर बाजारात आणण्याकडे अनेक उत्पादकांचा ओढा असतो. त्यातून एकाच वेळी असंख्य उत्पादक आपला माल बाजारात आणतात आणि मालाची आवक वाढते. अशी आवक वाढली की मालाचे भाव कोसळतात. त्यातून उत्पादकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. या पार्श्वभूमीवर कांद्याच्या भावात तर सतत चढ-उतार होत असतात. कधी हे भाव गगनाला भिडतात तर कधी अगदी मातीमोल किंमतीला कांदा विकण्याची वेळ उत्पादकांवर येते. अर्थात कांद्या
्या भावात मोठी वाढ झाली की ग्राहकांच्या डोळ्यात पाणी येते आणि भावात बरीच घसरण झाली की उत्पादकांच्या डोळ्यात पाणी येते. एकूण दोन्ही स्थितीतही कांदा आपला डोळ्यात पाणी आणणारा गुण कायम ठेवतो. त्यामुळे याच्या बाजारभावाचे गणित जुळवणे तसे कठीण असते.चांगला दर न मिळाल्याने किवा ग्राहकांनी पाठ फिरवल्याने कांदा अक्षरश: रस्त्यावर फेकून देण्याची वेळही उत्पादकांवर आली आहे. ही सारी परिस्थिती लक्षात घेता कांदा बाजारपेठेत नेमका कधी आणायचा, तोपर्यंत टिकण्यासाठी त्याची साठवण कोणत्या पध्दतीने करायची याची नेमकी माहिती उत्पादकांपर्यंत पोहोचायला हवी आहे.

आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात शेतकर्‍यांना घरबसल्या बाजारभावाची ताजी आकडेवारी प्राप्त करणे शक्य झाले आहे. पण या तंत्रज्ञानाचा फायदा घेणार्‍या शेतकर्‍यांची

संख्या बरीच कमी आहे. ती वाढायला हवी. तरिही मुख्य प्रश्न राहतो तो साठवणुकीचा. त्यासाठी उत्पादकांच्या शेतावर किंवा लगत गोदामे उभारण्याचा मार्ग सोयिस्कर ठरतो. कांद्याच्या गोदामांची उभारणी करताना 5, 10, 15, 20, २५ आणि 50 मेट्रिक टन क्षमतेचा विचार करायला हवा. या शिवाय अशी गोदामे उभारताना विशेष काळजी घ्यावी लागते. गोदामाची उभारणी करावयाची जागा पाण्याचा पूर्ण निचरा होणारी असावी. या ठिकाणी जाण्यासाठी सुकर रस्ते असणे आवश्यक आहे. गोदामात नैसर्गिक पद्धतीने हवा खेळती राहील याची काळजी घेतली जाणे आवश्यक आहे. या सार्‍या बाबी लक्षात घेऊन केलेली कांद्याची साठवणूक केव्हाही फायदेशीर ठरणारी आहे.

(अद्वैत फीचर्स)

— प्रा. डॉ. मुकुंद गायकवाड

2 Comments on कांदा साठवा, भाव मिळवा

  1. मला व्यावसायिक दृष्टीने कांदा साठवण करायची आहे मोबाईल नंबर 9822079054

  2. मला व्यावसायिक दृष्टीने कांदा साठवण करायची आहे, आपले मार्गदर्शन हवे आहे

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..