काढा मत्सर, काढा हेवा
हदयाला या पवित्र ठेवा
दिला तुला हदयाचा ठेवा
कितीजणींनी केला हेवा
आई,गुरू,मित्र,मुले,फुले
कुठेकुठे भेटतोस देवा?
अश्रुंनी तू पोट भरावे
गरिबांचा हाच सुकामेवा -हाच असे गरिबांचा मेवा
लिहितो गझला, लिहितो गाणी
सुरूच माझी समाजसेवा
ती दगडाची मूर्ती आहे -ती तर पाषाणाची मूर्ती
प्रदीपराजे आता जेवा
— प्रदीप निफाडकर
Leave a Reply