मनुष्य हा काळाच्या हातातील बाहूले असतो, काळ्-सुत्री बाहूले. तो बरेच काही ठरवतो पण घडतं तेच जे काळ ठरवतो.
माझ्या लहानपणापासुन पहाण्यातील एक व्यक्ती आहे,खूप कष्टाळु व मेहेनती, आता अन्दाजे वय ५८-६० असेल, पण मेहेनतीने व्यवसाय करायचे. लग्न झाले तेव्हा परिस्थिति अगदिच बेताची होती, कसेबसे खर्चाची तोंड मिळवणी व्ह्यायची, दोन वेळचे साधे जेवण कसेबसे मिळायचे त्यामुळे जीभेचे चोचले पुरवणे तर दुरच… पण मुले मोठी होत होती व संसाराचा गाडा चालू होता. हळुहळू काळ सरला, मुले मोठी झाली, कामधंद्याला हातभार देउ लागली व आर्थिक परीस्थीती सुधारू लागली. त्यातच अचानक वडीलोपार्जीत जमीनीला सोन्याचा भाव आला, पैसा अडका आला, नविन घर, गाडी ई सुखसोयी आल्या व आयुष्य सुखासिन झाले. धंद्यातपण बरकंत आली व सगळेच रुळावर आले. खाण्याची चंगळ सुरु झाली, जे जे पुर्वायुष्यात हुलकावण्या देत होतं ते ते मिळू लागलं.
एक दिवस साध्या आजाराच्या कारणाने तो मनुष्य माझ्याकडे आला व मला शंका आली म्हणुन रक्त तपासले तर मधुमेह असल्याचे निदान झाले. तो मनुष्य खेळकर स्वभावाचा असल्याने त्याने लगेच मिश्किलपणे हसंतच हे आयुष्याचे नवे वळंण स्विकारले. औषधे, पथ्य पाणी, आहार विहार याबद्दलची माहीती घेतली, मधुमेह झालाय हे कळल्यावरही तो दु:खी न होता त्याने ते लगेच स्विकारले हे बघून मला समाधान वाटले. ईकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर तो जाण्यासाठी उठला व हसंतच मनातील एक गोष्ट बोलला …… “तरूण वयात ईच्छा असुनही परीस्थीतेने खायला मिळंत नव्हतं व आता हवे ते खायला मिळणार तर खाऊ शकंत नाही” !
मिही क्षणभर स्तब्ध झालो, तो हसंतच खोलीबाहेर गेला, पण मी मात्र विचार करंत राहीलो की काळाचा खेळ पण काय अजब असतो ……… !!!
— डॉ. मयुरेश जोशी
Leave a Reply