कांजी काळ्या गाजरांपासून, पूर्वी हिवाळ्यात अर्थात जनवरी सुरूझाल्या बरोबरच जुन्या दिल्लीत ठेल्यांवर मोठ्यामोठ्या मटक्यात कांजी विकणारे दिसायचे. आज काल कुठे-कुठेच कांजी विकणारे दिसतात. शिवाय मसाले टाकल्या मुळे या ठेल्यांवर मिळणाऱ्या कांजी मूळ स्वाद हरवलेली असते. त्या मुळे सौ. घरीच कांजी तैयार करते. सौ.चे माहेर दिल्लीतल्या शिवनगर (सिख आणि पंजाबी बहुल वस्तीतच आहे). कांजी लौह तत्वाने भरपूर स्वादिष्ट कांजी एक पाचक पेय आहे. कांजी मातीच्या, चीनी मातीच्या किंवा काचेच्या भांड्यातच बनविल्या जाते. बनविण्याची रीत अत्यंत सौपी आहे.
साहित्य : पावभर काळे गाजर, हिंग (१छोटा चमचा), काळे मीठ (१ चमचा), मोहरीची डाळ (१ १/२ चमचे) व पाणी ३ लिटर (स्वच्छ) बस एवढेच.
ttp://2.bp.blogspot.com/-lCcD4vihhS8/Utt_VWMw7RI/AAAAAAAAAFU/mXiShxb2oWU/s1600/DSC05029.JPG
कृती: गाजर धुऊन, साल काढून, गाजराचे लहान लहान तुकडे करा. एका काचेच्या भांड्यात पाणी घालून त्यात गाजरांचेचे तुकडे टाका, हिंग,मोहरी आणि काळे मीठ टाकून भांडे झाकण लाऊन बंद करा. तीन ते चार दिवसात कांजी तैयार होईल. मुंबई सारख्या ठिकाणी २-३ दिवसातच. कांजी ७-८ दिवस व्यवस्थित राहते. जास्ती कडक वाटल्यास आणखीन पाणी घालता येते
— विवेक पटाईत
Leave a Reply