घनदाट काळ्या केसांसाठी
केसांच्या मुळांना मिळणारे पोषण हेच काळ्या, दाट आणि लांबसडक केसांचे रहस्य आहे. योग्य आयुर्वेदिक उपायांनी केस केवळ काळेच होतात असे नव्हे, तर त्या केसांवर एक नैसर्गिक चमकही दिसून येते. केस काळे करण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. कलर, डाय किंवा शाम्पूने केसांना पोषण मिळत नाही. आयुर्वेदिक जडी-बुटींनी केस धुतल्याने तसेच आयुर्वेदिक तेल लावल्याने पोषण मिळते. आयुर्वेदिक उपायांनी केस केवळ काळेच होतात असे नव्हे, तर त्या केसांवर एक नैसर्गिक चमकही दिसून येते. त्याचबरोबर केस गळणेही बंद होते.
काही आयुर्वेदिक उपाय काळ्या केसांसाठी.
आवळा पावडर आवळ्याची पावडर काळ्या रंगाच्या लोखंडाच्या भांड्यात एक दिवस ठेवा. दुसर्या् दिवशी सकाळी त्यात थोडे पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट संपूर्ण आठवडाभर पाणी मिसळून लोखंडाच्या भांड्यात ठेवा. आठवड्याभरात या पेस्टचा रंगही काळा होईल. पूर्ण काळी झाल्यानंतर ही पेस्ट डायप्रमाणे केसांना लावावी. दोन ते तीन वेळा वेगवेगळ्या दिवशी हा प्रयोग करून पाहा. केस नैसर्गिकरीत्या काळे होऊ लागतील आणि त्यांची चमकही वाढेल.
शिकेकाई शिकेकाई आणि सुका आवळा चांगला ठेचावा. दोन्ही तुकडे पाण्यात रात्रभर ठेवून सकाळी कापडाने हे पाणी गाळताना या कापडाने ते दाबून एकत्र करावे. या पेस्टने केसांना मालीश करावी. मालीशनंतर अर्ध्या तासाने अंघोळ करावी. केस वाळल्यानंतर खोबरेल तेल लावावे. असे केल्यास केस काळे, दाट, लांबसडक आणि चमकदार होतात. विशेष म्हणजे, शिकेकाई आणि आवळा वापरल्यास केस कधी पांढरे होत नाहीत आणि ज्यांचे पांढरे झालेत ते काळे होतात.
खोबरेल तेल, जैतुन तेल आणि लिंबू खोबरेल तेल आणि जैतुन तेल (ऑलिव्ह ऑईल) समप्रमाणात मिसळून त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. या मिश्रणाने केसांना मालीश करा. मालीशनंतर डोके गरम टॉवेलने तीन मिनिटे झाकून ठेवा. असे केल्यास केस गळणे थांबते आणि केस काळेही होतात.
मेथी पावडर मेथीच्या बियांमध्ये केसांना पोषक अशी सर्व तत्त्वे असतात. मेथीच्या दाण्यामध्ये फॉस्फेट, लेसिथिन, न्यूक्लिओ-अल्ब्युमिन आणि कॉड लिव्हर ऑईलबरोबरच फॉलिक अॅासिड, मॅग्नेशियम, सोडियम, जस्त, तांबे, नियासिन, थियामिन, कॅरोटिन अशी पोषकद्रव्ये असतात. ही पोषकद्रव्ये केसांच्या मुळांना मजबूत करतात. मेथीच्या दाण्यांचे ग्राईंडरमध्ये चूर्ण करून पाण्यात कालवून त्याची पेस्ट तयार करा. यामुळे केस काळे, दाट आणि लांबसडक होतीलच; शिवाय कोंड्याची समस्याही नाहीशी होईल.
अमरवेल सुमारे 250 ग्रॅम अमरवेल तीन लिटर पाण्यात उकळा. जेव्हा पाणी अर्धे उरेल आणि अमरवेल पाण्यात पूर्णपणे विरघळेल तेव्हा पातेले उतरवा. सकाळच्या वेळी या पाण्याने केस धुवा. यामुळे केस काळे, घनदाट आणि लांबसडक होतात.
त्रिफळा त्रिफळा चूर्णात निम्म्या प्रमाणात लोह भस्म मिसळा. हे मिश्रण सकाळ-संध्याकाळ सेवन केल्यास केस गळणे थांबते आणि केसांना नैसर्गिक रंग प्राप्त होतो.
कलौंजी( कांद्याचे बी.) एक लिटर पाण्यात पन्नास ग्रॅम कलौंजी उकळा. हे उकळलेले पाणी थंड करून त्याने केस धुवा. एक महिन्यात केस काळे आणि लांबसडक होतील.
कडुलिंब कडुलिंबाची पाने पाण्यात मिसळून ठेचून पेस्ट तयार करा. ही पेस्ट डोक्याला लावा. दोन ते तीन तासांनी केस धुवा. यामुळे केस गळणे कमी होऊन ते लांबसडक आणि काळेही होतील.
मेंदी आणि आवळा कोरडी मेंदी आणि कोरडा आवळा समप्रमाणात घेऊन सायंकाळी पाण्यात भिजत घाला. रात्रभर भिजविल्यानंतर सकाळी या पाण्याने केस धुवा. असे वारंवार केल्याने केस काळे, मुलायम आणि लांबसडक होतात.
रिठा एक ग्रॅम कापूर, १०० ग्रॅम नागरमोथा आणि रिठ्याच्या फळाचा गर, पावशेर शिकेकाई आणि200 ग्रॅम आवळा हे मिश्रण एकत्र करून दळा. अर्धा ग्लास पाण्यात हे मिश्रण टाकून लेप तयार करा. हा लेप केसांना लावून केस सुकेपर्यंत वाट पाहा. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. यामुळे केस काळे, घनदाट आणि लांबसडक होतील. तसेच ते सिल्की आणि चमकदार होतील.
शंखपुष्पी शंखपुष्पीपासून तयार केलेले तेल दररोज केसांना लावले तर पांढरे केसही काळे होतात.
भांगरा डोक्यावरील काही भागात केस नसतील, तर भांगराच्या पानांचा रस काढून त्या भागात लावावा. काही दिवसांनी तेथे काळे केस उगवू शकतात. ज्यांचे केस वारंवार गळतात अशा व्यक्तींनी हा उपाय जरूर वापरून पाहिला पाहिजे. त्रिफळा चूर्णाला भांगराच्या रसात उकळून नंतर ते व्यवस्थित वाळवावे. नंतर हे मिश्रण दळून ठेवा. हे मिश्रण दररोज सकाळी केवळ दोन ग्रॅम सेवन करा. यामुळे केस पांढरे होणे थांबते.
काळे तीळ काळ्या तिळाचे तेल केसांना लावल्याने केस पांढरे होत नाहीत. दररोज तिळाच्या तेलाने मालीश केल्यामुळे केस नेहमी मुलायम, काळे आणि लांबसडक राहतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ.डॉ. भारत लुणावत.
पांढऱ्या केसांसाठी उपाय सांगा
सर माझे वय 25वर्षं आहे तरी माझे केस पांढरे झाले आहेत काही उपाय सांगा