नवीन लेखन...

काही खास एक्स-रे

१. आपल्याला सतत सर्दी होत असेल व डोके जड होत असेल किंवा आपला खोकला बरा होत नसेल आणि छातीचा फोटो नॉर्मल असेल तर आपल्याला पीएनएस हा एक्स-रे काढावा लागतो. यात सायनसचा त्रास आहे का हे पाहिले जाते. हा एक्स-रे उभे राहूनच काढणे योग्य होय. कारण आपल्या सायनसमध्ये भरलेल्या पू ची पातळी यात दिसून येते.

२. लहान मूल जर झोपताना तोंड उघडे ठेवत असेल व घोरत असेल तर नेझोफॅरिन्क्स चा खास एक्स-रे आपल्या मुलाचे वाढलेले अॅडेनॉइड्स दाखवू शकेल.

३. स्त्रियांमध्ये मासिक पाळी एकदम बंद होऊन जर स्तनांमधून स्त्राव पदार्थ येऊ लागला व डोके दुखू लागले तर डोक्याचा एक्स-रे आपल्या मेंदूमधील एका ग्रंथीला येणार्‍या गाठीचे निदान करु शकतो. या गाठीला पिच्युइटरी अॅडिनोमा म्हणतात व ही गाठ वाढली तर डोळ्यांना आपल्याला नीट दिसू शकत नाही.

४. आपल्या कानातून सतत पू येत असेल व हळूहळू कमी ऐकू येत असेल आपल्या कानाच्या मागील एक कवटीचे हाड पोखरले गेलेले असू शकते. यासाठी एक खास एक्स-रे आहे, “मॅस्टॉइड”. हा आपल्याला कान पुढे पकडून काढायला सांगितला जातो.

५. आपल्या माकडहाडाला पूर्वी फ्रॅक्चर झाले असले किंवा आपले मोठे ऑपरेशन झाले असले तर आणि पुरुषांमध्ये लघवी आडत असेल तर युरेथ्रोग्राम हा एक्स-रे सांगितला जातो. पुरुषांमध्ये लघवीच्या नलीला चाप बसलेला असल्यास तो तपासण्यासाठी युरेथ्राग्रामचा उपयोग होतो. यात शिस्नाच्या तोंडातून एक रेडिओओपेक कॉन्ट्रास्ट औषध इंजेक्ट केले जाते. त्यामुळे युरेथ्रामधिल अरुंद मार्ग अभ्यासता येतो. काही मुलांमध्ये जन्मत: युरेस्थ्राच्या मागे असलेली झडप त्या मुलांची लघवी अडवू शकते व किडणी फुगण्याचा धोका निर्माण होतो.

६. दाताचे डॉक्टर आपल्याला दोन प्रकारचे एक्स-रे काढायला सांगतात. आय.ओ.पी.ए. हा छोटासा एक्स-रे असून त्याची प्लेट छोटी असते. ती दाताच्या मागे धरुन व दाताजवळ एक्स-रे ट्यूब धरुन हा एक्स-रे काढला जातो. दुसरा एक्स-रे ओपीजी., यात फोटो मोठा असतो व याला स्पेशल मशिन लागते. या फोटोत आपल्या वरच्या व खालच्या जबड्याचा मोठा व अख्खा एक्स-रे स्पष्ट येतो. याचा मुख्य उपयोग जबड्याची फ्रॅक्चर्स व कॉस्मेटिक डेंटिस्ट्री यात होतो.

— डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे

डॉ. श्रीकांत राजे
About डॉ. श्रीकांत राजे 21 Articles
ठाणे येथील सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट. एक्स-रे आणि सिटी स्कॅन या विषयांतील तज्ज्ञ. मेडिव्हिजन या डायग्नॉस्टिक्स सेंटरचे संचालक. “मेडिकल इमेजिंग” या क्ष किरण व मॉडर्न इमेजिंग विषयांवरील पहिल्या मराठी पुस्तकाचे लेखक. सर्वसाधारण माणसाला या विषयावरील महत्वाची माहिती थोडक्यात मिळण्यासाठी या पुस्तकाचा मोठा उपयोग झाला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..