काही नात्यांना कधीनाव द्यायचं नसतंहवेला मुठीमध्येकधीच पकडायचं नसतं..ㅤगाभार्यातली समई देवांना उजळून टाकते,तुळशीपाशी सांजवातअंगणात उजेड माखते,चुलीतल्या निखार्यावरभाकरी टम्म फुगली,शेकोटीच्या चटकत्या उबेतथंडी पसार झाली,तरी त्या ज्योतीला चिमटीत धरायचं नसतं..काही नात्यांना नाव द्यायचंच नसतं….!ㅤसांजवेळी अंधारातकाजवे लुकलुकतात,दंवबिंदूंच्या भारानंपाकळ्या हळूच झुकतात,उमलत्या फुलाचे परागकणरांगोळी सजून दिसते,चिमुकलं फुलपाखरूत्यावर हळूच बसते,मनाला कितीही भावलंतरी चिमटीत धरायचं नसतं..काही नात्यांना
नाव द्यायचंच नसतं….!ㅤझुंजुमुंजू होताचपूर्वेला गुलाल सांडतो,सूर्याचा पहिला किरणतिथे केशर माखतो,सोनपिवळ्या आभाळातकोणी चुकार ढग,हिरव्याकंच धरतीवरहलकेच शिडकाव करतो,आभाळ भरून इंद्रधनूसप्तरंगी दिमाख दिसतो,रंग गोजिरवाणे जरीत्यांना मुठीत धरायचं नसतं..काही नात्यांना नाव द्यायचंच नसतं….!ㅤकाही नात्यांना कधीनाव द्यायचं नसतंहवेला मुठीमध्येकधीच पकडायचं नसतं..ㅤ- स्वामीजी १८ जुलै २०११
— स्वामी निश्चलानंद
Leave a Reply