का ‘मी मराठी’ ?
मी ‘मराठी’ आहे कारण…
– घरी येताना पिझ्झा खाल्ला तरी,
वरण-भात, साजूक तुपाशिवाय माझं पोट भरत नाही.
मी ‘मराठी’ आहे कारण…
– ख्रिसमस, NEW YEARच्या जरी पार्ट्या मित्रांसोबत केल्या तरी,
घरात ‘पाडवा’साजरा करतोच.
मी ‘मराठी’ आहे कारण…
– जाम, सॉस कितीही आवडत असले तरी,
चटणी-लोणच्याचे ५-७ प्रकार तरी घरात सापडतील.
मी ‘मराठी’ आहे कारण…
– रागाच्या भरात/चेष्टेत मित्रांना कितीही इंग्लिशमध्ये शिव्या दिल्या तरी,
ठेच लागल्यावर ‘आई गं’ हेच शब्द तोंडात येतात.
मी ‘मराठी’ आहे कारण…
– हॉटेलमध्ये पैसे द्यायला जरी मागे रहात असलो तरी,
मित्रास त्रास देणा-याच्या ४-५ थोबाडात लावण्यास कमी पडणार नाही.
मी ‘मराठी’ आहे कारण…
– ‘छत्रपती शिवाजी महाराज की’
हे ऐकल्यानंतर माझ्या तोंडून आपसूक ‘जय’ आल्याशिवाय राहत नाही.
मी ‘मराठी’ आहे कारण…
– कितीही ‘HIGH LIVING’ असलो तरी,
हात जोडून ‘नमस्कार’ बोलल्या शिवाय माझी ‘ओळख’ होत नाही.
मी ‘मराठी’ आहे कारण…
– कितीही ‘BRANDED PERFUMES’ वापरले तरी,
‘उटण्या’शिवाय माझी ‘दिवाळी’ साजरी होत नाही.
मी ‘मराठी’ आहे कारण…
– गाडीतून जाताना ‘मंदिर’ दिसलं
कि,
आपोआप ‘हात’ जोडल्याशिवाय मी राहत नाही.
माझ्यातले ‘मराठी’पण जोपासण्याची मला गरज नाही.
ते माझ्या ‘रक्तात’ भिनलंय.
आणि…
या ‘मराठी’पणाचा मला खूप खूप ‘गर्वच” आहे.
जय हिंद ! जय महाराष्ट्र !!!
Leave a Reply