ब) म्हशीचे दुध:
१)भस्मक रोगात किंवा जेव्हा अतिभूक लागते व काही खायला न मिखाल्याच त्रास होतो तेव्हा नियमीत आहार मध्ये म्हशीचे दुध,तुप,लोणी हे पदार्थ असावेत.
२)रात्री शांत झोप लागण्याकरिता म्हशीच्या १ ग्लास दुधात १/४ चमचा जायफळ घालून उकळावे व खडीसाखर घालून हे दुध प्यावे.
३)ज्या पुरूषाचे पुरुष बीज प्रमाण कमी असते त्यांनी आहारात म्हशीचे दुध,तूप व लोणी वापरावे.
म्हशीचे दुध अतिप्रमाणात प्यायल्यास अती झोप येते व स्थूलपणा येऊ शकतो.
क) बकरीचे दुध:
१)टिबी,खोकला,छाती व बरगड्या ह्यात वेदना होणे ह्यात बकरीचे दुध पिणे उत्तम.
२)वारंवार होणाऱ्या जुलाबात बकरीचे दुध फायदेशीर ठरते.
३)डोळ्यांचा थकवा,डोळे दुखणे,ह्या तक्रारीमध्ये बकरीच्या दुधाच्या घड्या डोळ्यांवर ठेवाव्यात.
बकरीचे दुध अतिप्रमाणात प्यायल्याने संडासला घट्ट होऊ शकते.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
Leave a Reply