तसा कोहळा पौष्टिक असला तरी काही श्रध्दा अंधश्रद्धा ह्या फळाशी जोडल्या गेल्या आहेत जसे ह्याचा वेल बहरला आणी भरपूर फळे लागली कि ते अपशकुन मानला जातो,बऱ्याच घरात हा आणणे शिजविणे निषिद्ध असते.तसेच दृष्टबाधा होऊ नये म्हणून ह्याचे फळ धरा बाहेर बांधतात.
एवढे चांगले फळ पण किती शापित बिच्चारे नाही का हो!बरे ह्याचा उपयोग खायला देखील केला जातो बरं का.आग्रा फेमस पेठा कोहळ्यापासून बनवितात,आपण उन्हाळयात करतो त्या वड्या कोळ्याच्याच,खीर देखील करतात,काहीजण ह्याचा खवा देखील करतात.आणी हे सगळे पदार्थ पौष्टिक असतात बरं का.
कोहळ्याचा वर्षायू वेल असतो.ह्याची पाने ४-६ इंच लांब व हृदयाकृती असतात,पाने पिवळी २ इंच व्यासाची असतात.फळ अंडाकृती १-११/२ फूट लांब व वर सफेद पावडरचे आवरण असणारे असते.
हा चवीला गोड,थंड व वात पित्त दोष कमी करणारा व कफ दोष वाढविणारा असतो.
चला आता ह्याचे औषधी व घरगुती उपचारात महत्त्व पाहूया:
१)अंगाची आग होत असल्यास फळाच्या गराचा लेप करावा.
२)अम्लपित्तामध्ये कोहळ्याच्या रसात साखर घालून प्यावे.
३)बुद्धि व धारणाशक्ती वाढवायला पिकलेल्या कोहळ्याच्या १/४ कप रसात १/२ चमचा ज्येष्टमध उगाळून घालावे व हे मिश्रण रोज सकांळी अनशापोटी प्यावे.
४)४ चमचे कोहळ्याचा रस+ ४ चमचे आवळा रस रोजसकाळीघ्यावाह्यानेथुंकी ,नाक,लघ्वी,
मुळव्याध ह्यातून होणारा रक्त स्त्राव कमी होतो.
५)डोळ्यांची आग होत असल्यास व डोळे लाल होत असल्यास कोहळ्याच्या रसांच्या घड्या डोळ्यावर ठेवाव्यात.
६)वजन वाढवायला ४ चमचे कोहळ्याचा रस +गव्हाचे सत्व १/२ चमचा+ खडी साखर १ चमचा रोज सकाळी अनशापोटी घ्यावे व वर १२ सुर्यनमस्कार घालावेत.
कोहळा अति खाल्ल्यास शरीर स्थूल होऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Thanks
छान माहिती धन्यवाद
खुप छान माहिती धन्यवाद