आसमान से टपके खजुर में अटके हि म्हण सर्वांनाच माहित असणार.तर हा खजुर आपल्या सर्वांचाच आवडता पण ह्याचे खरे राष्ट्रीयत्व अरब देश आहे बरं का.म्हणजेच काय तर हा परदशी पाहुणा आपल्या देशात आला आणी आपलाच बनून गेला.
अत्यंत रूचकर फळ आपण सुक्यामेव्यात पण ह्याचा चांगलाच फडशा पाडतो नाही का.अत्यंत पौष्टिक देखील आहे हा.खजुराची चटणी अगदी कशावर ही छान लागते,खजुर बर्फि,खजुर घातलेली शेवयांची खीर,किंवा पक्वान्नांमध्येच कशाला नुसता देखील हा सुरेख लागतो.
ह्याचा सुपारीच्या झाडा सारखे दिसणारे झाड असते.ते बरेच उंच असते आणी त्याला हे खजुर लागतात. खजुर चवीला गोड असतात,थंड असतात व हे शरीरातील वात व पित्त दोष कमी करतात.
चला आता ह्याचे घरगुती उपाय पाहूयात:
१)संडासला साफ होत नसल्यास २-३ खजुर रात्री पाण्यात भिजत घालावेत व सकाळी ते पाण्यात कुचकरून ते पाणी प्यावे.
२)जुनी जखम बरी होत नसेल कर त्यावर खजुराचे पोटीस बांधावे व खजुर तुपासह खावा.मात्र हि जखम मधुमेहामुळे झाली नसावी.
३)४ खजुर+ १ चमचा शिंगाडा पीठ तुपावर परतावे व खाऊन त्यावर दुध प्यावे.ह्याने रक्त कणांची वाढ होते.
४)लहान मुलांना दात येत असताना होणाऱ्या जुलाबात मधासह खारीक उगाळून द्यावी.
५)डोके दुखत असल्यास खारकेचे बी उगाळून कपाळास लावावे.
६)घामोळ्यांवर खजुराचे बी उगाळून लावावे.
७)खजुराचे बी कुटून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे व ते पाणी पिण्यासाठी वापरावे ह्याने अंगातील उष्णता कमी होते व वारंवार लागणारी तहान देखील.
८)खजुराच्या बिचा लेप उगाळून तो पापण्यांवर लावल्याने डोळे लाल होणे,डोळ्यांची आग होणे कमी होते.
खजुर अतिखाल्ल्यास भुक मंदावणे,अजीर्ण व जुलाब होतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply