५)भाताच्या लाह्या:
पचायला हल्क्या, पथ्यकर,तहान शमविणाऱ्या,त्रिदोष शामक,गोड,थंड गुणाच्या,अम्लपित्त,उल्टी,मळ मळ ह्यात उपयुक्त.
६)ओदन(भात):
नवीन तांदुळाचा भात पचायला जड,कफकर,कुकर मधला पाणी मुरवून केलेला भात देखील पचायला जड,शरीरात चिकटपणा निर्माण करणारा,कफकर असतो.
पाण्या तांदुळ शिजवून वरचे पाणी काढून टाकले कि तो भात गोड,पचायला हल्का असतो.
ताकात शिजवलेला भात वातनाशक,कफ पित्तकर असून मुळव्याधीत पथ्यकर आहे.
भाजलेल्या तांदुळाचा भात रूचीकर,कफनाशक,वात पित्त नाशक,पचायला अत्यंत हल्का,जुलाब व तापामध्ये पथ्यकर आहे.
६)तांदुळाची खीर:
अर्धे दुध आटल्यावर त्यात तांदुळ घालून न जास्त दाट न अतिपातळ अशी केलेली खीर पचायलाजड,बलकारक,धातुपुष्टीकर,
पित्तशामक,सारक,पौष्टीक असते.
७)तांदुळाच्या पिठाचे पदार्थ:
फारशी शक्ती न वाढविणारे,कफ पित्तकर,जड,उष्ण असतात.
तांदुळ सेवनाचा अतिरेक केल्यास वजन,व शरीरात फाजील कफाची वाढ होते.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
Leave a Reply