आता आपण ताक कधी पिऊ नये व कोणी पिऊ नये ते पाहूयात:
१)फुफ्फुसाला जखम होऊन थुंकीमधून रक्त पडत असल्यास त्या व्यक्तिने ताक पिऊ नये.
२)अशक्त व कृश व्यक्तिने ताक पिऊ नये.
३)बेशुद्ध पडणे,चक्कर येणे,अंगाची आग होणे ह्या तक्रारीमध्ये ताक पिऊ नये.
४)कोड,त्वचा रोग,अंगावर पुरळ येणे,गळवे होणे,मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव अधिक होणे अशा तक्रारी मध्ये ताक प्यायचे नाही.
५)पित्ताचा त्रास जसे तोंड येणे,पोटात आग होणे,अंगावर पित्त उठणे,कावीळ,तोंड आंबट कडू होणे,पुष्कळ तहान लागणे,खुप घाम येणे अशा तक्रारी मध्ये ताक पिणे अयोग्य आहे.
६)उन्हाळा व शरद ऋतुमध्ये ताक पिंऊ नये.
७)घोळ हा ताक प्रकार प्यायचा असल्यास दह्याचे सर्व नियम पाळावे.
८)सर्दी,खोकला होण्याची सवय असणाऱ्यांनी जेवणानंतर,सकाळी दहा पुर्वी व संध्याकाळी ७ नंतर ताक पिऊ नये.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
Leave a Reply