४)मेंढीचे तुप:
पचायला जड,तत्काळ पोषण व बल गाणारे,शरीर पुष्ट करंणारे.नाजूक प्रकृतीच्या माणसांनी ह्याचे सेवन करू नये.
५)ताजे तुप:
श्रमनाशक,तृप्तीकर,नियमीत भोजनात सेवन केल्यास अशक्तपणा,रक्ताची कमतरता भरून काढते.तसेच डोळंयाना हितकर आहे.
६)जुने तुप:
दहा वर्षांवरील तुपास रसायन म्हणतात.शंभर वर्ष जुन्या तुपाला कुंभसर्पि म्हंणतात.त्याहीपेक्षा जुने तुप म्हणजे महाघृत होय.जसजसे तुप जुने होत जाते तसे ते अधिक गुणकारी होते.जुने तुप खोकल्याचा नाश करते,डोळ्यांना हितकर आहे,टाळुवर चोळून जिरवले असता मानेच्यावरील सर्व आजारांना बरे करते,तसेच ते त्वचारोगा मध्ये देखील उपयुक्त आहे.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
Leave a Reply