धणे व कोथिंबीर ह्यांचा उपयोग आपण आपल्या जेवणात नेहमीच करतो.धणे हा मसाल्याचा एक पदार्थ.गोव्यात ह्याचा नियमीत उपयोग हा माशांची आमटी अर्थात हुमण करताना केला जातो तसेच गरम मसाला करताना देखील ह्याचा उपयोग केला जातो.
धणे हे कोथिंबीरीच्या क्षूपाचे फळ आहे.धणे हे चवीला गोड,कडू,तुरट अशा मिश्र चवीचे असते.आणी हे थोडे उष्ण असतात.उष्ण असले तरी देखील हे शरीरातील वात,पित्त आणी कफ ह्या तिन्ही दोषांना कमी करतात.
आपण सगळेच जण धणे घरगुती औषधात वापर तो.चला तर मग धण्यांचे घरगुती औषधांमध्ये उपयोग थोडे सविस्तर पाहूयात.
१)उल्टया होत असल्यास ४ ग्राम धणेपूड+१०ग्राम साखर तांदूळाच्या धूवणासोबत खावे नक्की फायदा होतो व उल्टया थांबतात.
२)एॅसीडीटी व संडास साफ न होण्याची तक्रार असल्यास १ चमचा गुलकंद+१ चमचा धणेपूड हे मिश्रण तांदूळाच्या धुवणातून संध्याकाळी चार वाजता घ्यावे .
३)२ चमचे गुळ+१ चमचा मध+१ चमचा धणेपूड हे मिश्रण दिवसातून २-३वेळेस नियमीत घेतल्यास लघ्वीचा त्रास कमी होतो.
४)तोंडास चव नसेल तर धणे,वेलची व मिरी ह्यांच्या चुर्णाचे मिश्रण तूप साखरेसोबत घ्यावे.
५)पोटात गॅसेस होत असल्यास धण्याचा काढा साखर व मध घालून घ्यावा.
तसेच आंधूरली आली असल्यास धण्यांची पुरचुंडी थंड पाण्यात भिजवून डोळ्यावर ठेवणे,डोकेदुखीत धण्यांचा लेप करणे,लघ्वीची जळजळ होत असल्यास धण्याचा काढा साखर घालून घेणे इ.हे उपाय आपल्यापैकी ब-याच जणांना माहीत असणार ह्यात शंकाच नाही.
धण्यांचे अतिसेवन केल्यास त्याचा दुष्परिणाम पुरूषांच्या स्पर्म काऊंटवर होऊन ते कमी होऊ शकतात तसेच स्त्रीयांमध्ये मासिकपाळी अनियमित येणे अथवा मासिक पाळीच्या वेळेस स्त्राव कमी होणे असे होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply