हे लोकप्रिय फळ असून सर्वांनाच आवडते त्याला आपला पोपट तरी कसा अपवाद असेल.आपल्या सर्वांना ती बाल कविता आठवत असेलच “पोपट पोपट बोलतोस गोड खाना जराशी पेरूची फोड”.
ह्याचा आता जाम,आयस्क्रीम,सरबत अस,वड्या असे बरेच रूचकर पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत.
पेरूचे सदाहरित झाड असते,पाने जाड,गोलसर,कडक,व सुगंधी असतात.कच्चा पेरू हिरवा तर पिकल्यावर पिवळा व आतील गर पांढरा व भरपुर बियांनी भरलेला असतो.
हा कच्चा असताना तुरट लागतो व पिकल्यावर गोड.कच्चा पेरू खाऊ नये.खायला व औषधासाठी पिकलेला पेरू बियाकाढून त्याचा गर वापरावा.
पिकलेला पेरू गोड,थंड,पित्त व वात दोष कमी करणारा व कफ दोष वाढविणारा असतो.
आता आपण ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:
१)पोटात जळजळ,घसा कोरडा पडणे,हात,पाय,डोळे ह्याची आग ह्यात जेवणानंतर १ तासाने पिकलेला पेरू खावा.
२)चालल्यावर थकवा येणे,पोटऱ्या दुखणे,घसा कोरडा पडणे ह्यावर सकाळी रिकामी पोटी १ पेरूचा गर+२ चमचे मध+१ चिमूट सैंधव हे मिश्रण घ्यावे.
३)संडासला साफ होत नसल्यास महिनाभर रोज रात्री एका पेरूचा गर खावा.
४)मोठ्या सर्जरी नंतर थकवा कमी करायला व जखम लवकर भरून यायला रोज १ पेरू+१ चमचा मध+१/२ चमचा साजुक तूप खावे.
५)लहान मुलांना पौष्टिक म्हणून खायला १ पेरूचा गर+ मध द्यावा.
पेरू खायचा अतिरेक केल्यास सर्दी,पडसे होऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply