आपण जेवणात वापरत असलेला हा सुगंधी मसाल्याचा पदार्थ.साखरभात,शीरा,पुलाव हे खाद्यपदार्थ असो अथवा गरम मसाला असो सर्वांमध्ये ह्याचा वापर केला जातो.तसेच मुख शुद्धी करीता विडया मध्ये ही लवंग वापरण्याची पद्धत आहे.
लवंग ह्या फुलांच्या सुकवलेल्या कळया असतात.खरे पाहता लवंगाच्या कळयांमध्ये एक सुगंधी तेल असते पण बाजारात मिळणा-या लवंग हे तेल काढलेली असतात.तेल युक्त लवंग रंगाने काळे दिसतात आणी त्याला नख लावल्यास त्यामधून तेल निघते.
असे हे लवंग चविला तिखट कडू आणी थंड असते.हे शरीरातील कफ आणी पित्त दोष कमी करते.तर आता आपण लवंगाचे काही औषधी उपयोग पाहुया.
१)मुखदुर्गंधी अर्थात तोंडाला घाण वास येत असल्यास लवंग तोंडात धरून अथवा विडयात घालून चघळावा.
२)अजीर्ण झाले असल्यास २ग्राम भाजलेल्या लवंगाची पूड मधा मध्ये मिसळून चाटावी.
३)पोटदुखीमध्ये ४ चिमूट लवंग पूड+१ चिमूट हिंग+१ चमचा साजूक तूप हे मिश्रण खावे व त्यांवर कोमट पाणी प्यावे.
४)ताप आल्यावर फार तहान लागते तेव्हा १ लिटर पाण्यात ६ लवंग घालून ठेवावे व हे पाणी थोडे थोडे पित रहावे ह्याने तहान तर कमी होतेच पण ताप उतरायला देखील मदत होते.
५)उचकी येत असल्यास १ चमचा लवंगाची राख + १ चमचा मध हे मिश्रण चाटायला दयावे फायदा होतो.
दात किडून दुखत असल्यास लवंग अथवा लवंगाच्या तेलात बुडविलेला कापूस दाताखाली ठेवावा.डोके दुखत असेल तर लवंगाची लेप कपाळावर लावणे हे उपाय आपणा सर्वांना माहीत असतीलच ह्यात शंकाच नाही.
अतिप्रमाणात खाल्ल्यास तोंडात उष्णतेचे येतात तसे फोड येऊ शकतात तसेच शरीरातील धातू क्षीण होतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply