गोडाचा शिरा म्हणा,खीर म्हणा,मिठाई,मुरांबा, कोणताही गोड पदार्थ घ्या हिचा मनमोहक सुगंध त्या पदार्थाला आला नाहीतर त्या गोडधोड पदार्थाची सगळी मजा आणी लज्जतच निघून जाते बुवा. तर अशी सुंदर नाजूक सुवासिक वेलची अथवा वेल दोडा.विडा,चहा ह्यांना देखील एक वेगळीच रंगत देऊन जाते नाही का?
गरम मसाल्यातील हा पदार्थ ह्याचे छोटे क्षुप असते आणी आपण वापरतो ती वेलची म्हणजेच ह्या क्षूपाची फळे होय.चवीला थोडी तिखट गोड आणी थंड अशी ही वेलची आपल्या शरीरातले वात,पित्त आणी कफ हे तिन्ही दोष आटोक्यात ठेवते.
हिचा उपयोग फक्त गोडधोड पदार्थातच होतो असे नाही तर घरगुती उपचारांमध्ये देखील आपण हिला वापरू शकतो बरं का!आश्चर्य वाटले का?
चला तर मग पहायचे ना ह्या इवल्याशा वेलदोड्याचे औषधी गुण:
१)संडास मधून आव पडत असल्यास वेलचीपूड लोण्यात मिसळून द्यावी.
२)चक्कर येणे,मळमळणे,डोके दुःखी ह्यात १/२ चमचा वेलची पूड+१/२ चमचा जीरे चूर्ण+ ४ चमचे लिंबाचा रस+१ चमचा साखर हे मिश्रण वारंवार चाटायला द्यावे.
३)उचकी लागत असल्यास १ चमचा वेलचीची राख+ २ चमचे मध हे चाटण वारंवार चाटावे.
४)वेलचीच्या साली+रिठे पाण्यात उकळावे आणी हे मिश्रण आंघोळी पुर्वी अथवा दिवसातून २-३ वेळेस अंबाला लावावे ह्याने अंगाची खाज कमी होते.
५)खोकला येत असल्यास १/२ चमचा वेलची पूड मधासोबत मिसळून दिवसातून तीन वेळेस घ्यावे.
वेलची खाण्याचा अतिरेक केल्यास आतड्यांना अतिरिक्त चालना मिसळून पोटदूखी आणी संडासला पातळ होणे ह्या तक्रारी सूरु होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply