आपल्या मनाविरुद्ध आणि आपल्यापेक्षा कित्येक पटीने वयाने मोठ्या असणार्या व्यक्ती बरोबर लावून देण्यात आलेलं लग्न, आणि यामधून निर्माण झालेले सांसारिक प्रश्न कुंकू या चित्रपटातून उत्तमरित्या मांडण्यात आले आहेत. शांता आपटेंनी उत्तमरित्या आणि समर्थपणे साकारलेली अन्यायग्रस्त स्त्रीची भूमिका चित्त वेधून घेते. त्याकाळच्या अनिष्ट समाजरुढींवर प्रकाश टाकणारा कुंकू हा मराठीतला उत्कृष्ट सामाजिक चित्रपट ठरतो.
चला तर मग पाहूया, १९३७ साली प्रदर्शित झालेल्या, कुंकू या चित्रपटातील एक गाजलेलं गाणं..
—
Leave a Reply