परवा आमच्या शहरातल्या मोठया कपडयाचा दुकानात जाण्याचा योग आला.असा योग नेहमीचं येतो.
सौ.चा हट्टच होता.मेहूणी आली होती.
आम्ही त्या अलीशान, भव्य दुकानात शिरलो.ते पण कसबसं… यात नेहमीचं प्रचंड गर्दी असते. दुकानातल्या गर्दीला एक प्रकारची शिस्त असते.या दुकानात तसं काही नाही नसतं.तो एक बाजारचं असतो. नुसता गर्दा… कसं उभा राहयचं .
लेडीज विभात गेलोत. त्यात पुन्हा वयानुसार, फॅशननुसार विभाग …
दवाखान्यात जसे सुपरस्पॅशालिटी डाॅक्टर असतात अगदी तसंच इथं ही होतं . सारं सारं स्पशेलचं. दुकानात पोहचल्या नंतर माझं काम संपलं होतं. माझ्या एटीएमचा ताबा त्यांनी कधीच घेतला होता.
मी आपलं उग इकडं तिकडं पहात होतो काय करणार? समोरच्या एका कांऊटरवर मला एक मुलगी दिसली.
ती सेल्स गर्लच होती. या दुकानात दोनशे तीनशे तरी वर्कर असतील.
त्यात ती नवखी वाटत होती .थोडी आर्कषक होती. अगदीचं मोहक वगैरे नाही. बाकीचं पण अनेक मुली मुलं होती.काही प्रौढ ही होती पण ती जरा वेगळीच वाटतं होती. ती तन्मयतेने काम करतं होती. ग्राहकाला तत्पर सेवा देत होती. तिचं बोलणं शांत होतं.ते ब-यापैकी मधूर असावं.मला तर ती प्रमाणिक वाटतं होती.मी तिच्याकडं वांरवार पहातो आहे हे तिच्या लक्षात आलं. तिच्या चेह-यावर संकोचाची रेषा उमटली.
मी आता तिच्याकडं पहाणं टाळल. आता चोरून वगैरे पहाणं तर योग्य नव्हतं. मी आपलं वेडयाचं सोंग….घेऊन इकडे तिकडे पहात बसलो. तिच्या बरोबरची पोरं होती.ते चांगलेचं चेकाळली होती.ते तरूणचं होती.आणि त्यांच्या त्या हरकती तारूण्य सुलभचं होत्या.पण ती त्यातली नव्हती. ती शांत होती.मला जरा सोज्वळ वाटली . उलट ती तो धिंगाणा..मस्ती टाळत होती . मला पण एक कळत नव्हतं.माझं लक्ष तिच्याकडंचं का जातं होतं? काहीचं कारणं नसतानी नजरानजर होई. तो अपघातचं असे. तशी ती जास्त संकूचली….
थोडया वेळात एक प्रौढ बाई आली.
तिच्या हातात एक वायरची पिशवी होती. ती जरा थबकत थबकत चलत होती. तिचं कुणीतरी हरवलं असेल का ? ती कुणाला शोधत होती?
तिनं तिथंचं जवळ एका मुलाला विचारलं,” आरं तू इथचं कामाला आसतुस काय ?”
“हा..काय घ्यायचं ?” त्या पोरांनी जरा तिरकसचं प्रश्न केला.
“घ्यायचं नाही.मला दयायचं ..”
” दयायचं…..? इथं काय द्यायचं ?इथं फक्त ..दिलं जातं.”
” आर, आमची आशी हाय कामाला इथं . दिसली का तुला ?”
“आशी….कदमाची का चाळकाची ?
” चाळकाची …मयी पोरगी हाय ती”ते पोट्ट तिथूनच आरडलं.
“ऐआश्ये….इकडं बगय तुही आय आली.” आता त्याचा आवाज ऐकून
सारीचं माणसं भांबरली. त्या बाईकडं पाहू लागली. आता हयो काय गुन्हा केलाय आपणं .आस तिला वाटलं.
ती वरमलीचं. सारेच टकमक तिच्याकडं पाहू लागली.ती तरा तरा चालत त्या आशीकडं गेली.
आशीला मात्र हे आवडलं नव्हतं. तिचा परावर चढला होता. चढलेला पारा चेह-यावर कुठं झाकत असतो व्हयं ? आशी राग रागच पहात होती.
ती जवळ गेल्या गेल्याच आशी म्हणाली,” कशाला आल्लीस ग इथं ?”
” कशाला म्हंजी…..? तू भाकरीचं गठूड तसचं इसरून आल्लीसा. मग दिवस भर काय खाशीलं?”
” तेवढयासाठीच आल्लीस व्हयं ?”
” हा…कुठून आणून खर्ची?ते पाटलाचं
टॅम्पो आल्लाय बाया घेऊन. ”
“बाया कशाला ?”
” त्या मळयात नाही का पल्ली दिल्ली.तिच्यात ज्वारी काढायची.”
” मोलाणी आणल्यात वयं ?”
” मग… बायाचं मिळाणातं …तीनशं रूपयं रोजं केलाय त्यांनी. इक्काश्या भी लयं माग लागला व्हता. आपल्याला काय ? टेंप्पूत बसायचं. जायचं. ती लखा आत्या म्हणत होती.आश्यीला…. उगचं दुकानावरं पाठीलसं. चार हजारात काय होतं? बाहेरं असं दहा दिसं जरी काम भेटलं तरी झालं. उग कशाला महिनाभर टल्ल खात बसायचं?”
” गप्प भर तू…? जा..आता ”
” म्या जाते…. हे घे. यात आळुच्या वडयात…दिल्लत साखर मावशीनं पानं ते केल्यात. खा लगीचं ?”
” म्या खाल्लयं थोडं ? ”
” आता काय खाल्लसा ?”
” खाल्ला वडा पाव… आणला होते ”
” कुणी….? कोण्या पोराबिरांनी आणलेलं खाऊ नक्कू… ? पोरं लयं टुकार निघाल्लीत आत्ताची.”
” आये..जा बरं तू…:
तिचा काय पाय ओढत नव्हता. तिला अजून काहीतरी बोलायचं होतं. ती मागं फिरल्याली वरळून आली.तिला पालून घेतलं.आश्यी येतं नव्हती.एकदाची ती कटून लावावी म्हणून आली.
“आये…जा भर त् आमचं शेठ बघत्या.
गि-हाईक पण आढून बसलेत.लयं खडूस हाय हयो लहाना सेठ ”
” म्हणूचं म्हणत्ये? आसलं कामचं नक्कू बाई. आसल्याच्या नजरा लयं वाईट आसत्यात. ”
” आग तसलं नाही ग ? ”
” याचं दुकानातली पोरगी पळून गेल्लती गेल्या वर्षी…तेव्ह टॅप्पूवाला दत्या म्हणत व्हता.” आता या दोघी बोलतं बसलूयावर…तिथं सारा खोळंबाचं झाला. तिकडं ते दोनं पोरं…आणि एक पोरगी कानात कुजबजत यांच्याकडं पाहून हासत व्हती. आशीला कसं तरीचं झालं. तिला रागचं आला आयीचा .
” त्या दत्याचं नक्कू सांगूस लय नाय शहाणा…. तसली का मी ?”
” तसं नाय ग चिमणे…पण उग केलं कुणी काठीचं कोल्हं तर ? हाय का कुणी आपल्याला गरीबाला…?” आशीचं आय पार काकुळती आल्लती
तिचं ही खोटं नव्हतं. जगात काय म्हणून घडतं नाही.
” आज घरी येणारं मी. मग ठरू.आत्ताचं कमून डोक्कं खाती?”
“तसं नाय पण ….जीवाला घोरं लागुतीये…” ती पुन्हा जवळ गेली.
तिच्या डोक्यावरून हात फिरीला. बोटं कडाकडा मोडली.
” येते मी. दत्या नुसता काव्हणं.उशीर केल्यामुळे…राग नक्कू येऊ देऊस..माझे चिमणे,.. पण दिवसचं खराब आल्लेत बग. पोरांनी काही दिल्लं तर घेऊ नक्कू. आपलं फटकूनचं वाग…काहीचं आसत्यात तसल्या पण गव्हा बरूबर किडं भी रगडत्यात.” ती तरा तरा चालायला लागली. दोन तीन पाय-या उतरल्यावर…तिथूनचं ओरडली.
” आश्ये ..! भाकरी मोकळया करून ठेव.नाय तर त्यावरलं बेसणं खराब होईल.” आशीनं पुन्हा तिच्याकडं बघितलं. ती वायरची पिशवी कांऊटरच्या खाली मांडली. ती पण गुपचूप…. हे सारं मी पहात आहे. तिच्या लक्षात आलं. ती अजून वरमली. तिनं मानं खाली घातली ते वरचं केली नाही. आता पुन्हा ती माझ्याकडं पहात नव्हती. तसं तिनं ठरवलचं असावं. थोडावेळ झाला.
सौ. आणि श्रुति आल्या. त्यांना आता त्याचं कांऊटरला खरेदी करायची होती. जिथं ही अशा होती . त्या दोघी पुढं सरकल्या तसा मी ही सरकलो.त्यांची खरेदी सुरू झाली. तिला एखादी साडी पंसत होणं सोप काम नाही.सारे कंटाळणारं पण ती नाही कंटाळात.आशा त्यांना फार तत्परतेने सारं दाखवत होती. यांच्या स्टाईलला कमी नव्हती. ग्राहक हा राजा असतो.हे सौ.ला पक्कचं ठाऊक असतं. तिला तसचं फिलींग होतं.
टाईमपास म्हणून…एक बडीशेपची पुडी तोडली. आणी रिकामा पाऊच कचराकुंडीत टाकायला गेलो. पहातो तर… तीचं वायरची पिशवी त्यात होती. मी खात्र करावी म्हणून ती उचलून पाहिली. तर भाकरीचं गठोड ही तसचं होतं. मी उचलली आणि तशीचं घेऊन आलो. आशा माझ्याकडं पहात होती. एकटक….
मला मात्र कळत नव्हतं. तिनं असं अन्न का फेकून दयावं ?
तिला काय नाकारायचं होतं ? ते गरीबाचं अन्न….की तिच्या आईचं भाबड प्रेम ?
वास्तव नाकारून ती कसल्या स्वप्न रंगात तर रंगली नव्हती ना ? का कुणात जीव रंगला असेल तिचा … ?
— परशुराम सोंडगे,पाटोदा
9673400928
Leave a Reply