नवीन लेखन...

कृतज्ञता

मी आज तुम्हांला चित्रपटातील हिरो व जगावर अधिराज्य करणारा सुपरस्टार, खर्‍या जीवनातही कसा सुपरहिरो आहे ते सांगणार आहे . . .

अंदाजे जानेवारी-फेब्रुवारी 1984 सालची ही गोष्ट . . .

त्या काळातील नावाजलेले सुपरहिट डायरेक्टर-प्रोड्युसर प्रकाश मेहरा हे सन 1982 ते 1984 च्या दरम्यान प्रचंड आर्थिक नुकसानीत होते . . .

गाडी, बंगला व इतर संपत्ती सर्व गहाण पडले होते . . .

राजाचा रंक कसा व कधी होईल हे अनेकांना न समजणारी गोष्ट आहे . . .

या वाक्याप्रमाणेच प्रकाश मेहरा यांचे झाले होते . . .

प्रचंड कर्जाच्या ओझ्याने सर्व बाजूने दबाव व मार्केटमधील कमी होत चाललेली पत पाहता प्रकाशजींना जगणे मुश्कील झाले होते . . .

परंतु प्रकाश मेहरा हार मानणार्‍यांपैकी नव्हते . . .

एक दिवस त्यांना एक पटकथा समोर आली, त्यांना ती खूप आवडलीही, पण या पटकथेला शोभणारा व योग्य न्याय देणारा हिरो असावा तर फक्त अभिताभ बच्चनच . . .

असे त्यांना मनोमन वाटले, पण अमिताभ बच्चन तर सुपरस्टार आहे, त्यांच्याकडे अनेक मोठ्या बॅनरचे चित्रपट आहेत आणि आपल्याला त्यांचे मानधन द्यायला जमेल का?
असे अनेक प्रश्न निर्माण झाले . . .

या आधी अमिताभ बच्चन यांना बरोबर घेऊन अनेक चित्रपट केलेले होते. प्रकाश मेहरांनी निर्देशित केलेल्या अनेक चित्रपटांमुळेच अमिताभ हे सुपरस्टार झाले होते. प्रकाश मेहरांनी ‘जंजिर’ या चित्रपटात प्रथम भूमिका दिली होती व तिथून पुढेच अमिताभजींचे सर्व चित्रपट सुपरहिट होत गेले.
पण या बाबत त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारचा अहंभाव व अहंकार उफाळून आला नाही.
उलट अमिताभ हा सुपरस्टार आहे म्हटल्यावर आपला चित्रपट साईन करेल का ? या विचारांनी मनात काहूर उठले होते . . .

काय करावे ? काय करु नये ? या विचारात आठ दिवस प्रकाश मेहरांचे मन सुन्न झाले होते, पण नंतर विचार केला की आपण एक फोन करुन तर पाहू . . .?

मनाची तयारी करुन प्रकाशजींनी अमिताभ बच्चन यांना फोन लावला . . .
फोन PA नी ऊचलला, आणि त्याने बच्चन साहेबांना फिल्म निर्देशक प्रकाश मेहरांचा फोन आहे असे सांगितले . . .

बच्चन साहेबांनी फोन घेतला व बोलायला सुरुवात केली . . .

समोरुन प्रकाश मेहरा :
“अमिताभजी, माझ्याकडे नवीन व अर्थपूर्ण स्क्रिप्ट तयार आहे आणि मला वाटते की, यातील मुख्य भुमिकेला फक्त तुम्हीच न्याय देवू शकता . . . !”

अमिताभ बच्चन यांनी काहीही उत्तर न देता फोनचा रिसीव्हर ठेवून दिला . . .

प्रकाशजी खूप नाराज झाले, त्यांना वाटले की, सुपरस्टार असल्याने बच्चनसाहेब खूप बिझी असणार; अन् आपल्या चित्रपटात काम करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसणार; म्हणूनच काहीही उत्तर न देता फोन ठेवला असावा . . .?

या प्रकाराने प्रकाशजींचे डोकं खूप जड झालं होतं, त्यांनी पत्नीला चहा मागितला . . .

फोनच्या रिसीव्हरकडे एकटक नजर लावून प्रकाशजी चहा घेत होते . . .

अचानक दारावरच्या बेलचा आवाज खणखणला . . .

प्रकाशजी स्वत: उठले व जड पावलांनी दार उघडण्यासाठी गेले . . .

समोर बघतात तर काय?

दरवाज्यात फिल्मइंडस्ट्रीमधील सुपरस्टार पत्नी जया बच्चन यांच्यासह दांपत्य साक्षात हजर होते . . .

प्रकाशजींना प्रचंड आनंद झाला . . .

तोंडातून शब्दही फुटेना . . .

आभाळ ठेंगणे वाटायला लागले . . .

साक्षात परमेश्वरच आपल्या दारात उभे असल्याचा भास झाला . . .

प्रकाशजी व त्यांच्या पत्नीने दोघांचे आदराने स्वागत केले . . .

पाहुणचाराबरोबर चर्चा चालू झाली . . .

प्रकाश मेहरा नवीन स्क्रिप्ट सांगू लागले . . .

तेवढ्यात अमिताभ बच्चन यांनी त्यांना थांबविले व म्हणाले की, “प्रकाशजी, तुम्हाला स्क्रिप्ट आवडली म्हटल्यावर मला सांगण्याचा प्रश्नच येत नाही . . .!”

“आत्ता लगेच अॅग्रीमेंट करुन घ्या व आज पासून तीन महिन्यात आपला चित्रपट रिलिज झाला पाहिजे अशा तयारीला लागा . . .!”

असे बोलून अमिताभ बच्चन यांनी सध्या चालू असणार्‍या चित्रपटांच्या निर्देशकांना लगेच फोन केले व सांगितले की, “मी तीन महिने आपल्या चित्रपटांचे शुटिंगसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही. आपले उर्वरित शुटिंग तीन महिन्यांनंतरच सुरु होईल . . .”

प्रकाशजींनी वकील बोलावून डाॅक्युमेंटची व्यवस्था केली . . .

पण अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एक अट घातली . . .

अमिताभ बच्चन :
“आपला चित्रपट न थांबता सलग काम करुन चित्रपट तीन महिन्यात पुर्ण करु…!
पण त्यासाठीचे माझे मानधन मी स्वत: ठरविणार . . .
तुम्ही द्याल त्यात माझे समाधान होणार नाही . . .

प्रकाश मेहरा हे आधीच आर्थिक अडचणीत ? त्यात ही वेगळीच अट ? काय करावे काही समजेना ?
पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर खूप गाजणार व सुपरहिटही होणार याची खात्री असल्याने त्यांनी लगेच ही अटसुध्दा मान्य केली . . .

सर्व डाॅक्युमेंट तयार झाले अन् सहीसाठी अमिताभ बच्चन यांच्यापुढे ठेवले . . .

अमिताभ बच्चन यांनी अॅग्रीमेंटवर आधी सह्या केल्या व मानधनाच्या जागी स्वत: रक्कम टाकली . . .

मित्रांनो; ही रक्कम होती फक्त एक रुपया . . .

?होय, फक्त एक रुपयाच . . . !

अजब आहे ना ?
?यालाच तर कृतज्ञता म्हणतात . . .

ज्या माणसांमुळे आपण सुपरस्टार झालो, तो माणूस आज अडचणीत आहे आणि त्यांना अडचणीतून बाहेर येण्यासाठी आपली मदत होते म्हटल्यावर निस्वार्थपणे लगेचच पुढे होऊन समोरच्याला सावरण्यासाठी खूप मोठे मन व वाघाचे काळीज लागते . . .

प्रकाशजींनी अॅग्रीमेंट वरील रक्कम पाहिली व त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले . . .

प्रकाशजींनी उभे राहून बच्चन साहेबांना मिठी मारली व एकदाचा बांध फुटला . . .

साक्षात माणसातला माणूसकी जपणारा भगवंत आज त्यांना सावरायला त्यांच्या घरी, त्यांच्या जवळ हजर होता . . .

मित्रांनो, येथे दोन्ही मातब्बर श्रेष्ठ म्हणावे लागतील . . .

कारण प्रकाश मेहरांनी जर पूर्वी चांगले काम केले नसते तर हा दिवस उजाडलाच नसता . . .

बरोबर तीन महिन्यांनी म्हणजे 18 मे 1984 रोजी संपूर्ण देशभर सर्व चित्रपटगृहांमध्ये हा अनोखा व अायुष्याला कलाटणी देणारा चित्रपट रिलीज झाला आणि सुपर-डुपर हिट ठरला . . .

?हा अनोखा चित्रपट होता ____शराबी

हाच तो चित्रपट ज्याने प्रकाश मेहरांच्या आयुष्याला नव कलाटनी देवून पुन्हा सोन्याचे दिवस आणले . . .

मला माहिती आहे की, मी थोडक्यात वाचलेली वा ऐकलेली ही कथा माझ्या शब्दशैलीत लिहिल्यामुळे एखाद्याला आवडेल किंवा नाही पण आवडणार . . .

पण मला मात्र कृतज्ञता या शब्दाच्या अर्थासाठी अगदी समर्पक वाटली म्हणून अवर्जून लिहिण्याचे धाडस केले आहे . . .

आयुष्यात आपणही असेच वागलो तर आपल्याही आयुष्याचे सोनं होईल असे मला मनोमन वाटते . . .

?नाहीतरी या जन्मात दुसरे आहेच काय ?

आपल्यामुळे जर एखाद्याचा संसार पुन्हा उभा राहत असेल तर यापेक्षा आपल्या आयुष्यातील पुण्याचे काम दुसरे असूच शकत नाही . . .

म्हणून आपल्या बरोबर असणारांचा नेहमी आदर करा… त्यांना विश्वासाने जिंका, व त्यांनी केलेल्या उपकाराची जाणीव पावलो-पावली ठेवा . .

WhatsApp वरील संजीव वेलणकर यांच्या संगीत संगीत आणि फक्त संगीत या ग्रुप वर आलेला लेख साभार प्रकाशित.

Avatar
About संगीत WhatsApp ग्रुप 23 Articles
श्री. संजीव वेलणकर यांनी सुरु केलेल्या “संगीत संगीत आणि फक्त संगीत” या Whatsapp समूहावरील पोस्ट आणि लेख....

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..