केले नाही एकही पाप
आता होतो पश्चाताप
वृध्दाश्रम हा रडतो आहे
पाच पोरांचा आला बाप
मोरपिसांना घेऊन मेघा
माझी कविता तू तरी छाप
देशामध्ये सारे साधू
एकमेकांना देती शाप
सुंदर मन हे असले म्हणजे
गझला सुचतात आपोआप
— प्रदीप निफाडकर
केले नाही एकही पाप
आता होतो पश्चाताप
वृध्दाश्रम हा रडतो आहे
पाच पोरांचा आला बाप
मोरपिसांना घेऊन मेघा
माझी कविता तू तरी छाप
देशामध्ये सारे साधू
एकमेकांना देती शाप
सुंदर मन हे असले म्हणजे
गझला सुचतात आपोआप
— प्रदीप निफाडकर
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions
Leave a Reply