नवीन लेखन...

केशर-सेंद्रियातून संजीवनी – (पुस्तक परिक्षण)





केशर-सेंद्रियातून संजीवनी

लेखक: कृषिभूषण सुरेश वाघधरे (पुस्तक परिक्षण)

प्रयोगशील माणसे ही नेहमीच नव्याचा ध्यास घेत कार्यरत असतात. सुरेश वाघधरे हे नावसुद्धा शेतीत प्रयोग करणाऱयांमधील एक प्रमुख आहे. म्हणूनच त्यांच्या प्रयोगाची माहिती देणाऱया `केशर ः सेंद्रियातून संजीवनी’ या पुस्तकाची तिसरी सुधारित आवृत्ती प्रसिद्ध झाली. या नव्या आवृत्तीचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या दोन वर्षांत त्यांनी जे प्रयोग केले प्रामुख्याने वीजनिर्मिती, शेण, गोमूत्र, स्लरी, खतनिर्मिती, सिंचनाची किफायतशीर पद्धत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या २३ वर्षांपासून जे आपल्याला समजले ते दुसऱयाला सांगावे यानुसार शेतकऱयांसाठी माहिती त्यांनी अत्यंत खुलेपणाने उपलब्ध करून दिली आहे.

भूमाता व गोमाता यांचा समन्वय असेल तर शेती फायद्याची ठरते, हे सूत्र धरूनच त्यांनी प्रयोगाला सुरुवात केली. आज त्यांच्याजवळ 45 देशी गाई आहेत. त्यांचे शेण हे खत म्हणून, तर मूत्र हे कीटकनाशक म्हणून ते वापरतात. याशिवाय गांडूळ खत, व्हर्मी वॉश तयार करतात. पिकांच्या वाढीसाठी सिद्ध झाले. गोबरगॅसच्या माध्यमातून वीजनिर्मिती; पाण्यासाठी शेततळे या भक्कम पायावर त्यांनी केशर आंबा व आवळ्याची नर्सरी उभी करून शाश्वत शेतीची संकल्पना अस्तित्वात आणली. हे सर्व करताना शास्त्रीय दृष्टिकोन ठेवलाच. शिवाय डोळसपणा व व्यवहारी वृत्ती असल्याने ते यशस्वी होऊ शकले. या पुस्तकाच्या आधारे कोणत्याही शेतकऱयाने प्रयोग करायचा ठरविला तर तो यशस्वी होऊ शकतो. पुस्तकातील मांडणी तंत्रदृष्ट्या स्पष्ट असल्याने शंकांचे निरसन वाचतानाच होते. गाईचा गोठा कसा असावा, त्याचा आकार, उंची, प्रत्येक गाईसाठी जागा, उतार, तो कमीत कमी खर्चात कसा बांधता येईल याचे तपशीलवार वर्णन केले आहे. तसेच गाईंसाठी चाऱयाचे व्यवस्थापन कसे करावे, याचीही माहिती दिली. गोबरगॅसपासून वीजनिर्मिती करण्यासाठी कोणत्या प्रकारचा, आकाराचा गोबरगॅस प्लॉट असावा.

त्यासाठी रोज किती शेणाची आवश्यकता असेल,

वीजनिर्मिती किती होईल, बचत किती होईल, याचाही ताळेबंद स्पष्ट आहे. अशीच सचित्र व आराखडे, मोजमापासह गोमूत्र-शेणखडी प्रकल्पाची आहे. सेंद्रिय शेती करताना त्यांनी त्रिगुणात्मक सिद्धान्तावर भर दिला.विजेच्या टंचाईने महाराष्ट्र नव्हे, तर देश त्रस्त झाला असताना वीजनिर्मिती करून शेती स्वावलंबी करण्याचा त्यांचा प्रयोग हे या आवृत्तीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. ते विजेबाबत ८० टक्के स्वावलंबी झाले. वीजखर्चात 80 टक्के बचत केली. वीजनिर्मितीसाठी शेतातीलच साधनसामग्री वापरली. यातून परिसर स्वच्छता राखली. एकाच कामातून बहुविध उपयुक्तता स
धण्याचा द्रष्टा प्रयत्न त्यांनी केला आहे. पिकाच्या संरक्षणासाठी बुरशीनाशक व कीटकनाशकांचे उत्पादन त्यांनी कडूनिंबाचा अर्क, गोमूत्र, व्हर्मिवॉश यातून केले. त्यामुळे खर्च कमी झाला व रेन गनमधून देता येत असल्याने मजुरी वाचली.पाण्याचा भीषण प्रश्न सोडवितानाही त्यांनी हाच दृष्टिकोन ठेवला. रेन गनद्वारे पाणी दिल्यास 80 टक्के पाण्याची बचत होते. शेततळ्यात बदक व मस्त्स्योत्पादन असा एकत्रित प्रयोग केला. यामुळे मजुरी व पाण्याची बचत झाली. आज त्यांच्या शेतीसाठी बाहेरून म्हणजेच बाजारातून काहीही आणावे लागत नाही. खऱया अर्थाने ते स्वयंपूर्ण आहेत. ती कहाणी अत्यंत स्पष्ट व नेमक्या तपशिलासह त्यांनी दिली आहे.

केशर-सेंद्रियातून संजीवनी लेखक: कृषिभूषण सुरेश वाघधरे

किंमत : रुपये ५०/-


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..