नवीन लेखन...

कोणी तरी आहे तिथं

•जगातली कोणतीही व्यक्ती कोणत्याही व्यक्तीशी फक्त सहा बिंदूंनी जोडली जाऊ शकते. हे सहा बिंदू व्यक्ती, संस्था वगैरे काहीही असू शकतात. त्याचं म्हणणं होतं, फेसबुक वगैरे माध्यमातनं आपण उगाचच एक बिंदू सहज पुरवतो. हे काहींसाठी फायद्याचं असलं तरी त्याचा मोठय़ा प्रमाणावर गैरवापरही होऊ शकतो.

•या समाजमाध्यमांत आपण कसे वागतो, कशाला ‘लाइक’ करतो, कशावर कशी प्रतिक्रिया नोंदवतो याचं पूर्णपणे विश्लेषण होत असतं. आणि व्यावसायिक, राजकीय कारणांसाठी या विश्लेषणाचा उपयोग करता येऊ शकतो; किंबहुना तो केला जातोय.
•मायकेल कोसिन्स्की हा विख्यात मनोविश्लेषक व केंब्रिजमध्ये मायकेलचा सहाध्यायी डेव्हिड स्टिलवेल यांच्या अध्ययनानुसार,

•एखाद्या व्यक्तीच्या फेसबुकवरच्या फक्त ६८ लाइक्सवरनं ती व्यक्ती गोरी की काळी, स्त्री की पुरुष, धूम्रपान करणारी/ न करणारी, मद्यपान करणारी/ न करणारी आणि मुख्य म्हणजे त्यांची राजकीय आवडनिवड.. हे सगळं सगळं निश्चित करता येऊ शकतं. यातली अचूकता ९५ टक्के इतकी निघाली. म्हणजे अशा पद्धतीनं काढलेल्या शंभर निष्कर्षांतले फक्त पाचच अंदाज त्याचे तितकेसे बरोबर आले नाहीत. बाकी सगळे तंतोतंत तसे निघाले. पुढे पुढे या लाइक्सची संख्या आणखी कमी झाली. साधारण १० लाइक्सवरनंच त्याला हे सगळे अंदाज बांधता यायला लागले. यातला भयानक धक्कादायक भाग म्हणजे एखाद्याच्या ७० लाइक्सचा अभ्यास केला तर ती व्यक्ती तिच्या जवळच्या स्नेह्यलाही कळली नसेल इतकी कळते, १५० लाइक्सचा अभ्यास केला की त्या व्यक्तीच्या आई-वडिलांनाही कळलं नसेल इतकं काही कळून येतं. आणि ३०० लाइक्सचं विश्लेषण केलं तर त्या व्यक्तीच्या जोडीदाराला कळलं नसेल इतकं काही समजून येतं.

•याच तंत्रज्ञानाचा वापर ब्रेग्झिट आणि ट्रम्प यांच्या निवडणुकीत जनमत घडवणारं तंत्र एकाच कंपनीकडनं राबवलं गेलं ती कंपनी म्हणजे अलेक्झांडर निक्स यांची ‘केंब्रिज अ‍ॅनालिटिका.’

•ट्रम्प यांना अर्थातच केंब्रिज अ‍ॅनालिटिकाचं महत्त्व पटलंय. म्हणून तर या कंपनीच्या संचालकातले एक स्टिव्ह बॅनन हे ट्रम्प यांचे धोरण सल्लागार म्हणून नेमले गेलेत. आता अशीही बातमी आहे, की इंग्लंडमध्ये पंतप्रधान थेरेसा मे यांनी आगामी निवडणुकीसाठी या कंपनीशी बोलणी सुरू केलीयेत. निक्स हेही सूचित करतोय की स्वित्र्झलड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांतनं त्याला मागणी आहे.

•अर्थसंकल्पोत्तर भाषण करताना आपले पंतप्रधान बोलून गेले. निश्चलनीकरणाच्या काळात आम्ही प्रचंड डेटा गोळा केलाय, त्याची छाननी सुरू आहे. पाठोपाठ कारवाईही होईल.

•तो डेटाबॉम्ब आपणही अनुभवणार आहोत. आपण ऑनलाइन असू किंवा ऑफलाइन. आपल्यावर लक्ष ठेवलं जातंय.. कोणी तरी आहे तिथं!

संदर्भ:- लोकसत्ता

Avatar
About दीपक गायकवाड 33 Articles
दीपक गायकवाड हे महाराष्ट्रातील पहिली ऑनलाईन स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी- "आदित्य ॲकॅडमी" चे क्रिएटिव्ह डायरेक्टर तथा संस्थापक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..