नवीन लेखन...

कोल्हापूरी तांबडा रस्सा

 

साहित्य:
मटणाचे लहान तुकडे, कांदे, टोमॅटो, लसूण, आले, लवंग, दालचिनी, तमालपत्र, ओलं खोबरं, लिंबाचा रस, सुकं खोबरं, लाल सुकी मिरची, धणे, मीठ, लाल तिखट, हळद, तेल

कृती:
प्रथम मटण स्वच्छ धुवून त्याला थोटं मीठ आणि लिंबाचा रस लावून एक ते दोन तास झाकून ठेवावे. एका कढईमध्ये तेल गरम करुन त्यात सुकं खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घ्यावे. त्यानंतर त्यात लाल मिरची घालून व्यवस्थित भाजल्यानंतर गरम मसाला घालावे. हे मिश्रण थोडे थंड झाल्यावर मिक्सरमधून जाडसर वाटावे.
एका भांड्यामध्ये तेल गरम करुन त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावा. कांदा लाल होत आला की त्यात आलं लसूण पेस्ट घालून परतावे. नंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून हे मिश्रण एकजीव होईपर्यंत परतून घ्यावे. मग त्यात मटण घालून मटणाला पाणी सुटेपर्यंत परतत राहावे. मटण शिजल्यावर त्यात सुकं खोबरं, लाल मिरची आणि गरम मसाला यांचा वाटलेला मसाला घालून पुन्हा १० मिनिटे चांगले परतून पाणी घालून शिजवावे. व्यवस्थित उकळी आल्यावर त्यात ओलं खोबरं आणि काळी मिरी यांचे मिक्सरमध्ये केलेलेवाटण घालून चवीप्रमाणे मीठ आणि लिंबाचा रस घालावा. अशाप्रकारे झणझणीत तांबडा रस्सा खाण्यासाठी तयार. कोणत्याही प्रकारच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर हा रस्सा उत्तम लागतो.

पांढरा तांबडा रस्सा म्हणजे करवीरनगरी अर्थात कोल्हापूरची शान. कोल्हापूरला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. कोल्हापूरी साज, चप्पल अशा वस्तू जगभरात ओळखल्या जातात. पण त्याचसोबत खास आहे ती कोल्हापूरची खाद्यसंस्कृती. दगडी पाट्यावर वाटलेले मसाले वापरुन बनवलेलं झक्कास कोल्हापुरी मटण म्हणजे खवय्यांसाठी एक लज्जतदार ट्रीट. त्याचबरोबर ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती,मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठीही कोल्हापूर प्रसिद्ध आहे. कोल्हापूर जिल्हयाबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आणि या जिल्हयाला अधिक जवळून ओळखण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
[e-link-ms]kolhapur#/mahacities/index.php?show=Kolhapur&cid=31&lang=marathi[/e-link-ms]

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..