नवीन लेखन...

कौन बनेगा करोडपती ?

कौन बनेगा करोडपती ? हा प्रश्न विचारला जाताच करोडपती नसलेल्या जवळ – जवळ सर्वच लोकांचे हात वर जातात. याचा अर्थ करोडपती होण हे प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाच स्वप्न असत. त्या स्वनाच्याच मागे काही लोक आयुष्यभर धावत असतात त्यातील काही हार मानून गप्प्‍ बसतात तर काही आपल्या शेवटच्या श्वासापर्यत त्या स्वप्नाचा पाटलाग करीत राहतात. पुर्नजन्म असेल तर आपले हे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही काही लोक पुन्हा जन्म घेत असल्याची शक्यताही नाकारता येणार नाही. आता नुकताच नाशिकमध्ये केबीसी घोटाळा उगड झालेला आहे. हा घोटाला अंदाजे दहा हजार कोटीचा असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. हा घोटाळा उगड झाल्या झाल्या काही लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. करोडपती होण्याचे स्वप्न म्ह्णा अथवा श्रीमंत होण्याचा ध्यास म्ह्णा नाहीतर पैशाचा हव्यास म्ह्णा त्यामुळेच या लोकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. केबीसी मध्ये लोकांनी जवळ्पास दहा हजार कोटीची गुंतवणुक करेपर्यत या सर्वांशी संबंधित सरकारी यंत्रणा काय करीत होत्या ? वगैरे प्रश्न विचारण्यात काहीच अर्थ नाही. प्रत्येक वेळी सरकारी यंत्रणांवर खापर फोडून लोक मोकळी होतात. पण लोकांच्या मुर्खपणाच काय ? हा विचार कोणाच्या डोक्यात का येत नाही . जरा कोणी करोडपती होण्याचा मार्ग दाखविला की डोळ्यावर पट्टी बांधून आंधल्यासारखे लोक त्याच्या सोबत चालायला लागतात अगदी ठेच लागून पडेपर्यत. पण चालताना ते एकटेचालत नाहीत आपल्या सोबत आपल्या कुटुंबियांना, नातेवाईकांना, मित्र-मैत्रिंना आणि ओळखी- पाळखीच्या लोकांना ही सोबत घ्यायला विसरत नाहीत. आज ही बाजारात असे अनेक उद्योग सर्रास चालू आहेत, पण हे असे उद्योग चालायला आणि फोफावायला सरकारपेक्षा ही लोकच अधिक जबाबदार आहेत.

आजकाल लोकांना मेहनत करून पैसे कमवायचे नसतात तर कमी श्रमात, कमी वेळेत जास्तीत जास्त पैसे कमवायचे असतात. त्यासाठी ते कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात. तोंडातून साधा ब्र ही न काढणारी लोक जेंव्हा या अशा करोडपती करणार्‍या योजनांशी जोडली जातात तेंव्हा पोपटा सारखी बोलायला लागतात. समाजात मान-सन्मान असणार्‍या व्यक्ती या अशा उद्योगात गुंतल्यावर ते आपल्या सोबत हजारो लोकांना ही त्या उद्योगात अगदी सहज ओढतात. पण त्याच लोकांना जेंव्हा हे लक्षात येते की आपल्यावर विश्वास ठेवल्यामुळे हजारो लोकांचे पैसे बडाले तेंव्हा ते दुःख असहय झाल्यानंतर एकतर ते आत्महत्या करतात नाहीतर यासर्वाचा ताण असहय झाल्यामुळे हृद्यविकाराचा झटका आल्यामुळे आपले प्राण गमावतात. असे केबीसी सारखे घोटाळे उगड झाल्यामुळे गुंतवणुकदारांनी अथवा त्याच्याशी संबंधीत लोकांनी आत्महत्या करण्याचे प्रकार पहिल्यांदा घडलेले नाहीत. यापुर्वी ही असे अनेक घोटाळे उगड झालेले असतानाही गुंतवणुकदार जागे का होत नाहीत ? या प्रश्नाचे उत्तर शोधूनही सापडत नाही. काही वर्षापुर्वी अशाच एका योजनेत पैसे गुंतविण्यासाठी माझ्या एका मित्राने आग्रह केला असता मी संबंधीत योजनेत पैसे बुडण्या विषयीची शक्यता व्यक्त केली असता तो मला म्ह्णाला पैसे बडाले तर मी तुझे पैसे तुला परत देईन. त्यावर मी त्याला म्ह्णालो,’’ हे तू जे आता मला म्ह्णालास ते पुन्हा कधी ही कोणाला म्ह्णू नकोस. या योजनेतून फायदा झाला तर कोणी तुला त्या फायद्यातील हिस्सा देणार नाही मग तोट्याची जबाबदारी तू का घेतोस ? मी त्या योजनेत पैसे गुंतवायला नेहमी सारखाच स्पष्ट नकार दिला. त्यानंतर काही महिन्यातच त्या योजनेचे बारा वाजले तेंव्हा त्याला नक्कीच माझी आठवण आल्यावाचून राहिली नसेल त्याचे नशिब बलवत्तर म्ह्णून त्याने आपल्या जवळ्च्या नात्यातील लोकांनाच त्या योजनेत पैसे गुंतवायला भाग पाडले होते. नाहीतर त्याच्यावर किती मोठे संकट आले असते याची कल्पना ही करवत नव्हती.

मला माझ्या एखाद्या मित्रांने बर्‍याच वर्षानंतर फोन केला आणि तो मला म्ह्णाला,’’ की मला तुला भेटायचय माझं तुझ्याकडे एक काम आहे तर मी त्याला स्पष्टच सांगतो एखाद्या पैसे दामदुप्पट करणार्‍या योजने संदर्भात बोलायचे असेल तर मला भेटूच नकोस कारण त्याचा काहीच उपयोग होणार नाही. असा स्पष्ट नकार निदान या बाबतीत प्रत्येकाला देता यायलाच हवा. असा स्पष्ट नकार देता न आल्यामुळेच कित्येक लोक या योजनांचा आणि पर्यायाने या घोटाळयांचा बळी ठरत असतात. या अशा केबीसी सारख्या उद्योगात बहुसंख्य मध्यमवर्गीयच आपले पैसे गुतवित असतात, पैशाच्या लोभापाई तो आपली आयुष्यभराची कमाई गुंतवितो आणि आपल सर्वस्व गमावून बसतो. मध्यमवर्गीय माणसाने आता पहिल्यांदा मेहनत न करता अगदी सहज करोडपती होण्याचे स्वप्न पाहणे सोडून द्यायला हवे आणि हे स्वप्न त्यांना दाखवू पाहणार्‍यांच्या तोंडावर आपल्या घराचे दार बंद करायला शिकायला हवे. मेहनतीने ही माणूस करोडपती होऊ शकतो यावर पुर्वीसारखाच विश्वास ठेवायला हवा. जास्तीच्या पैशाची गुंतवणुक त्याने करायलाच हवी पण ती ही डोळसपणे ! मध्यमवर्गीय माणसाने इतकीच गुंतवणुक करायला हवी की ती जर दुदैवाने डुबली तर त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. करोडपती होण्याचे स्वप्न पाहण्यात तसे गैर काहीच नाही पण त्या स्वप्नामागे वेड होण हे नक्कीच हानीकारक आहे आपल्या आणि आपल्या देशाच्या भविष्यासाठी ही नाही का ?

— निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 421 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..