मृगाचा पाऊस
मृगाच्या पाऊसात
चिंब भिजली.
शरदाच्या कुशीत
धरणी प्रसवली.
कोरडा समुद्र
विरही वेदनेचा
खाऱ्या अश्रूंचा
समुद्र कोरडा.
रात्र श्रावणी
प्रेमात भिजली
रात्र श्रावणी.
गालावर लाली
पहाट सोनेरी.
[एकत्र चालत असूनही धरती आणि समुद्राचे कधीच मिलन होत नाही. खाऱ्या अश्रूंचा समुद्र प्रेमाचा गोड ओलावा आणणार तरी कुठून?]
— विवेक पटाईत
Leave a Reply