अंडरवर्ल्डमधील दुश्मनीमुळे ज्येष्ठ पत्रकार जेडेंचा बळी गेला का, असा प्रश्न विचारला जात आहे. जेडे आणि छोटा राजनची आधी जवळीक होती. पण जेडे छोटा शकीलच्या जवळ गेल्याचा संशय राजनला आला होता. त्यामुळे जेडेंची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे.
जे.डेंबद्दल खुप चांगलं ऐकलं होतं खरं तर… सत्याची काच
धरणारा माणूस… सत्यासाठी लढणारा.. सत्यावरच जगणारा.. आणि त्यामुळेच त्यांची हत्या झाली वैगेरे.. भारतातल्या तमाम पत्रकारांनी या हत्येनंतर निषेध व्यक्त केला.. करतायेत.. infact करायलाचं हवा.. पण पण पण… बातम्यात परत ऐकलं.. छोटा शकील आणि जे. डी. चे संबधावरून छोटा राजनने जे.डींची हत्या केली… काय चित्र उभं राहतं… याने….
पत्रकार निपक्ष असतात..भ्रष्टाचारी नसतात.. हे फक्त आणि फक्त अभ्यासक्रमापुरतेचं मर्यादीत राहते काय?
तसही media ethics.. वैगेरे कागदाताच अडकून राहिलेत … प्रबोधन..समाजकारण असे शब्द पत्रकारांनी एकांतात घेतले तर हसू येईल त्याच त्यालाचं.. हे थांबवा रे आता तरी…
देव करो जे.डींवरचे आरोप खोटे असू देत.. मुठभर का होईना प्रामाणिक पत्रकार आहेत त्यांच्या विश्वासाला तडा तरी जाणार नाही….
— स्नेहा जैन
Leave a Reply