नवीन लेखन...

खरे सुख

संत तुलसीदासाच्या काळातच रैदास नावाचे एक संतकवी होऊन गेले. त्यांचे खरे नाव रविदास. मात्र रैदास या नावानेच ते ओळखले जातात.

संत तुलसीदासांनी ‘तुलसीरामायण’ लिहिले तर संत रैदासाने अनेक भक्तिगीते लिहिली. ते वाराणसीत गंगेच्या किनाऱ्यावर एका झोपडीत राहत असत. आपल्या झोपडीच्या बाहेर बसून ते वहाणा शिवत असत. त्याच्यातून जेवढे उत्पन्न मिळायचे त्यावरच त्यांची गुजराण व्हायची.

त्यांची पत्नीही अतिशय समंजस होती. रैदास जेवढे काही मिळवून आणायचे त्यातच ती सुखासमाधानाने संसार चालवित असे. वहाणा शिवताशिवताच रैदास भक्तिगीते करीत असे त्यामुळे हातात काम व ओठात ईश्वराचे नाम असाच त्यांचा दिनक्रम चालत असे.

एकदा एक साधू वहाणा दुरुस्त करण्याच्या हेतूने संत रैदासाकडे आला. त्याच्या वहाणा दुरुस्त केल्यावर त्याने त्याच्या झोळीतून एक वेगळ्या रंगाचा दगड काढला आणि तो रैदासांना म्हणाला, ” हा परीस आहे. त्याला लोखंड लावल्यास त्याचे सोने होऊ शकते. त्यामुळे हा परीस तुझ्याकडे ठेव म्हणजे तुझे जन्माचे दारिद्र्य मिटेल.”

साधू एवढेच बोलून थांबला नाही. त्याने तेथलाच एक लोखंडाचा तुकडा घेतला. त्याला परीस लावताच त्याचे सोन्यात रूपांतर झाले. हा सोन्याचा तुकडा साधूने रैदासाला देऊ केला. मात्र रैदासाने तो सोन्याचा तुकडा नाकारला.

रैदास साधूला म्हणाला, ‘मी दिवसभर कष्ट करतो.. त्यातून पोटापाण्यापुरते जे काही मिळते, त्यात मी व माझी पत्नी मुखी व आनंदी. आहे. सोन्याचा हा तुकडा घेऊन मला माझा नेहमीचा आनंद हरवायचा नाही. कारण माझी सुखासमाधानाची व्याख्याच वेगळी आहे. तुला हा परिसाचा तुकडा कोणाला द्यायचाच असेल तर तो जे रात्रंदिवस पैशाच्या मागे लागले आहेत त्यांना दे.’

असे म्हणून रैदास पुन्हा आपल्या वहाणा शिवण्याच्या कामात मग्न झाले व तो साधू संत रैदासापुढे नतमस्तक होऊन तेथून निघून गेला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..