मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास सुरू झाला की सारा दिवस कटकटीचा जातो. मग त्यापासून सुटका मिळवण्यासाठी काही औषध-गोळ्या घेण्यापेक्षा खायची (नागवेलीची पानं) आणि एरंडेल तेल हा घरगुती उपाय नक्की वापरून पहा. खायचे पान थंड प्रवृत्तीचे असल्याने डोकेदुखीच्या त्रासापासून आराम मिळण्यास मदत होते. तसेच एरंडेल तेलामध्ये दाहशामक घटक व त्वचेत लगेच झिरपण्याची क्षमता वेदना त्वरीत दूर करण्यास मदत करतात. (एरंडेल तेल- गुडघेदुखीवर रामबाण उपाय)
कसे बनवाल हे मिश्रण ?
तव्यावर आवश्यकतेनुसार(काही थेंब) एरंडेल तेल गरम करावे. त्यावर खायची पानं पसरून दाबावीत. थोडी चॉकलेटी रंगाची झाल्यानंतर गॅस बंद करावा.पानं थोडी थंड झाल्यावर या पानांनी डोक्याच्या दुखर्यास भागावर शेक द्यावा.
कधी कराल हा उपाय ?
डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी थोडे गरम असतानाच या पानाने डोक्याला शेक द्यावा.
बडिशेपमध्ये कॅल्शियम, सोडियम, आर्यन आणि पोटॅशियम सारख्या खनिजांचा भरणा असतो. यामुळे स्मरणशक्ती वाढवण्यास बडिशेप फायदेशीर ठरते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१७३३
Leave a Reply