नवरात्रीत नियमितपणे केले जाणारे काही विधी
मालाबंधन
नवरात्रात देवीचे रोज मालाबंधन करावे. पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ बांधावी व नंतर प्रत्येक दिवशी तिच्या रूपा प्रमाणे मालाबंधन करावे.
महाकाली, महालक्ष्मी,महासरस्वती व शेवटी ‘विजया’ ही तिची रूपे आहेत. दुस-या व तिस-या दिवशी रक्तवर्ण पुष्पे नंतर तीनदिवस झेंडू, सोनचाफा, शेवंती,तुळशीच्या मंजिर्या व नंतर पांढरी सुवासिक फुलेह्यांची माळ करावी.
दीपप्रज्वलन
म्हणजे तेजाची पूजा. भगवंताच्या तेजाच्या पूजेने आपल्या हृद्यातील तो तेजोमय भाव जागृतव्हावा आणि तेजानेतेजाची पूजा करावी अशी कल्पना आहे.यासाठी दोन जड समया ठेवाव्यात व नऊ दिवसअखंड दीप चालू ठेवावा.
तेल संपल्या मुळे किंवा काजळी झटकताना जर दिवा शांत झाला तर विचार करण्याचे कारण नाही.
दिवा पुन्हा लावावा, पण सगळे व्यवस्थित असताना दिवा शांत झाला तर कुलदेवतेचा जपकरावा, तिची प्रार्थना करावी,क्षमा याचना करावी.
फुलोरा
नवरात्रात देवीला फुलोरा करण्याची पद्धत आहे.
यात करंज्या आणि कडक पुर्या, साटोर्या करतात.
हा फुलोरा कुटूंबातील प्रथेप्रमाणे तॄतीया, पंचमी,सप्तमी, अष्टमी या दिवशी करावा.
देवघरात मंडपी ठेवून हा फुलोरा बांधला जातो.
पूजा करताना आपण ‘ यथादेहे तथा देवे ‘ हा भाव ठेवून पूजा करतो.
त्यामुळे आपण तरी आपल्या घराला असेखरकटे बांधून ठेवू का?
ते खरकटे पदार्थ बांधून ठेवण्याची पद्धत चूकीची आहे.
त्यापेक्षा डब्यातठेवून त्याचा नेवेद्य दाखवावा. नेवेद्यदाखवितो म्हणजे काय करतो ? समर्पण भावनेनेअर्पण करतो. देव नेवेद्य द्विकरतो म्हणजे काय तर अर्पण करणार्याचा भाव पाहून वास घेतो.
होम
नवरात्रात अष्टमीला होम करण्याची प्रथा आहे. ब-याच ठिकाणी अजबली देतात. ‘अज’ म्हणजे बोकड. खाणे आणि हिंडणे या खेरीज बोकडाचा काय उपयोग? रस्त्यावरून चालला तरी लांबूनच त्याची दुर्गंधी येते.याची जातच कडू असते. याचे मांस भक्षण केल्याने बुद्धिला मांद्य येते. शिवाय तो रस्त्यावरील कुठेकचरा खातो, त्या पासूनच त्याचा रक्ताची निर्मिती होते.
असे मांस खाल्याने अनेक रोगांना अनेक रोगांना निमंत्रण मिळते.
म्हणूनच पूर्वीच्या ऋषिमुनींनी द्रष्टेपणानेहोमात अजबली देण्याची प्रथा सुरू केली.याच्या रक्ताने कनिष्ठ देवता प्रसन्न होतात.
नवरात्रात दुष्ट शक्तीचा नाश करण्यासाठीचआपण या देवी ( शक्ती ) स्वरूपाची पूजा करतो.
महाराष्ट्रात देवीची साडेतीन पिठे आहेत.
त्यापैकी कोल्हापूरची ” महालक्ष्मी”,तुळजापूरची “भवानी”, व वणीची “सप्तश्रुंगी”ही पूर्ण पिठे व माहुरची “रेणुका” हे अर्धपीठ आहे. कारण माहुरला फक्त तांदळा आहे. फक्त मुखपूजन आहे.तांदळा हे पार्वतीचे रूप आहे. तिथे शिवाचा लोपआहे.
इतर पिठामध्ये प्रत्येक मूर्तीच्या डोक्यावर शिवलिंग आहे. म्हणजे शिवशक्ती दोन्हीही आहे.देवीच्या-सेवा :श्री सुक्तांची आवर्तने उपाध्यायांकडून करवून घ्यावीत.
कुंकूमार्चन
देवीला कुंकू हे अतिशय प्रिय आहे. कुंकू हे हळदी पासून बनविले जाते. हळद ही सुवर्णाची गुणधर्म धारण करते.ती रजोगुणी आहे. तीला ते प्रिय आहे. स्त्रीचे रूपच अग्निस्वरूप आहे. त्यामुळे लाल रंग तिला प्रिय आहे.म्हणून कुंकूमार्चन सेवेने ती प्रसन्न होते. कुठल्याही देवतेच्या मुर्तीला कुंकूमार्चन करावे,त्यामुळे शक्तीदायिनी देवता प्रसन्न होतात व आपणास सामर्थ्य प्राप्त होते, सौभाग्य देते, ऍश्वर्यदेते. कुंकूमार्चन श्री यंत्रावर करतात.
Leave a Reply