९३ च्या बॉम्बस्फोटावर पु. भा. भावे
स्मृतिदिनानिमित खुली निबंध स्पर्धा
भाषाप्रभू पुरुषोत्तम भास्कर भावे ह्यांच्या येत्या १३ ऑगस्टला येणाऱ्या ३३ व्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या स्मृती समितीने सर्वांसाठी खुली असलेली निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. “१९९३ चे बॉंम्बस्फोट – जिहादी आतंकवाद आणि भारतीय मानसिकता” असा निबंध लेखनाचा विषय आहे. १९९३ च्या मार्चमध्ये मुंबईत जिहादी आतंकवाद्यांकडून झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर पुढील वीस वर्षात महाराष्ट्राच्या वैचारिक, साहित्यिक, सांस्कृतिक, धार्मिक, प्रशासकीय, न्यायिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि सामाजिक क्षेत्रातील आबालवृद्धांमध्ये झालेले लक्षणीय मानसिक परिवर्तन आणि त्याचा जिहादी प्रवृत्तीवर झालेला परिणाम यावर अभ्यासपूर्ण लिखाण अपेक्षित आहे. निबंधलेखक वरीलपैकी एक अथवा अनेक पैलूंवर लिखाण करू शकतात.
कमीतकमी १५५० आणि अधिकाधिक ३००० शब्द अशी लेखनसीमा आहे. निबंध १३ जुलै २०१३ पर्यंत भावे समितीकडे श्री. प्रसाद करकरे, कोषाध्यक्ष, भाषाप्रभू पु. भा. भावे स्मृती समिती, जी-३०१, कमल पार्क, लाल बहादूर शास्त्री मार्ग, मंगतराम पेट्रोलपंपाजवळ, भांडूप (प.), मुंबई ४०००७८ ह्या पत्त्यावर पोचायला हवेत अथवा
bhavesamitee@gmail.com ह्या पत्त्यावर इ मेलही करू शकता. निबंधाची मूळ प्रत अधिक दोन छायांकित (झेरॉक्स) प्रती पाठविणे आवश्यक आहे. लेख सुवाच्य लिहिलेला किवा टंकलिखितही चालेल. पहिल्या पांच सर्वोत्कृष्ठ निबंधांना योग्य ती पारितोषिके देण्यात येतील. भावे समिती स्वत: ह्या विषयावर जाणकारांचे लेख असलेली स्मरणिका प्रसिध्द करणार आहे. त्यात हे पाच लेख समाविष्ट करण्यात येतील तसेच स्पर्धेतील सर्व निबंधलेखकांची नावे स्मरणिकेत प्रसिध्द केली जातील.
शिवाजी मंदिर, दादर येथे १३ ऑगस्ट २०१३ दिवशी रा्रौ स्मृतिदिनाच्या नेहमीप्रमाणे भरगच्च होणाऱ्या कार्यक्रमात निबंध स्पर्धेतील पारितोषिके प्रदान केली जातील.
— श्री.जयेश शत्रुघ्न मेस्त्री
Leave a Reply