नवीन लेखन...

गणेश चतुर्थी

ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या महान्यूजसाठी लिहिलेला हा लेख महान्यूजच्या सौजन्याने मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी…..


आज प्रात:काळापासून हे ओथंबणार्‍या उत्साहाचे प्रसन्न वातावरण का बरे आहे? आज प्रत्येक मराठी घरात, मग ते घर मराठीच्या माहेरी महाराष्ट्रात असो वा सातासमुद्रापलीकडे कुठल्या विदेशात असो,

एका अबोध आनंदाचा सुगंध का बरे दरवळत आहे ? दिवस पावसाचे असल्यामुळे पाण्याचा पूर येणे समजू शकते. पण हा उत्साहाचा महापूर कशाचे द्योतक आहे ? सूर्य जसजसा वर येत आहे तसतसा वाढणारा हा आनंद, हा उत्साह, हा उत्साह, हा जल्लोष, कशाचा आहे ?अरे, कशाचा आहे म्हणून काय विचारता ? गेली हजारो वर्षे आजच्या दिवशी पूर्वेच्या उंबरठय़ावर पाऊल टाकणारा तेजोभास्कर आनंदाची लयलूट करीत येतो. गेली शेकडो वर्षे हा दिवस महाराष्ट्राच्या नाक्यानाक्यावर, गल्लीगल्लीवर उत्साहाचा गुलाल सहस्त्रहस्तांनी दाही दिशांना उधळत येतो. हा दिवसच तसा महत्त्वाचा आहे. आपल्या कुठल्याही मंगलकार्याचा प्रारंभ मग तो शिक्षणाचा शुभारंभ असो, विवाहासारख्या मंगलकार्याचा प्रारंभ असो, धार्मिक, सामाजिक कुठलेही काम असो, ज्याला सर्वप्रथम वंदन केले जाते, ज्याचे सर्वप्रथम स्मरण केले जाते त्या गणेश, गजानन, गणपतीचा आज जन्मदिवस आहे. हा गणपती विविध अवतार घेऊन या भारतवर्षात अवतरला दुष्टदुर्जनांनी साधुसंतांना सळो की पळो करुन सोडले, निरपराध जनता त्रस्त, भयग्रस्त झाली त्या त्या वेळी व त्या त्या युगाला साजतील अशी आयुधे घेऊन हा प्रतिकूलतेशी लढा देण्यास सिद्ध झाला. ह्याने जिथे म्हणून छळवणूक असेल तिथे तिथे याची दमदार पावले विरोधकांचा नायनाट करण्यासाठी सतत अग्रभागी वावरली. युध्द नसेल त्या वेळी लोकांच्या अंगातील गुण हेरुन त्यांना उत्तेजन देण्याचे कार्य ह्या गुणवंत गणेशाने केले. हा खाण्यात रंगला, हा कलारंगात दंग झाला, हा युद्धात विजयी झाला, हा संसारात समरस झाला.

पराक्रम करावा आणि पराक्रम करुन मिळविलेले ऐश्वर्य, वैभव सत
कृत्यांना उत्तेजन देण्यात कामी आणावे, असाच जणू ह्याचा रिवाज. हा गोरगरिबांचा कनवाळू, आपल्या खर्‍या भक्तांवर, आपल्याला मदत करणार्‍या सैन्यातील सैनिकांवर ह्याची नेहमी कृपादृष्टी कपट-कारस्थानी दुष्टांशी लढताना ह्याने त्यांच्याच मार्गाने त्यांना पराभूत केले. उदंड यशप्राप्ती झाल्यानंतर एका विजयोत्सवी मिरवणुकीत ह्याला एका कोपर्‍यात उभा असलेला शुक्ल नावाचा भक्त दिसला. इतर सर्व थोरामाठय़ांकडील आदरसत्कार नाकारुन हा त्या गरीब, सद्भावी अंत:करणाच्या भक्ताच्या घरी जाऊन पेज जेवला. अवघड काळात माणसाने पुडील पिढय़ांसमोर ठेवला. आजही हा सद्भावपूर्ण अंत:करणाने भक्ती करणार्‍यांना पावतो. ते बाजूला असले, कोपर्‍यात असले तरी ह्याचे त्यांच्याकडे नेमके लक्ष असते. अशा ह्याचा जन्मोत्सव पिढय़ान्पिढय़ा, शतकानुशतके अत्यानंदाच्या वर्षावात न्हाऊन साजरा केला जाऊ लागला.ह्याचा जन्म म्हणजे दुराचारांचा अंत, ह्याचा जन्म म्हणजे नवयुगाची प्रभात, याचा जन्म म्हणजे अंधकारात सापडलेल्यांना प्रकाशाचे किरण. तो जन्म ज्या तिथीला झाला ती ही आजची तिथी. मग ती उत्साहात न्हाऊन निघाली तर काय आश्चर्य ?(महान्यूजच्या सौजन्याने)

— ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..