नवीन लेखन...

गरीबी आणि जिद्द

विदर्भातील एका शहरात सहज भरकटत होतो. सकाळची वेळ असून ही उन्हं चांगलचं चटकत होतं. रसत्यावर गर्दी होती. खरं तर आम्ही चहाच्या शोधात होतोत. फुटपाथवर अनेक टप-या थाटलेल्या होत्या. त्यात चहाच्या टप-या ही होत्या.पण त्यात स्वच्छ तर एक ही नव्हती, पॉश पण नव्हती. अस्वच्छ होत्या. किळसवाण्या होत्या. त्यावर ही लोकांची झुंबड उडालेली होती.आम्हाला पाॉश हॉटेल हवं होत.बरीच पायपीट झाल्यानंतर ही तिथं चहा जाऊन प्यावं असं हॉटेल सापडलं नाही. एका टपरीजवळ थांबलो.
आम्ही थांबल्याबरोबर ती सारीचं माणसं आमच्याकडं पाहू लागली.कारण ही तसचं होतं.आम्ही सारे नटून थटून आलो होतो. पुढी-या टाईप. एकदम पाॅश…आम्ही तिथचं बाकडयावर टेकलो. बाकडांनी आमचं कपडे मळू नाहीत म्हणून सावध बसलो. अल्लाद…
” तीन चाय दे लवकर.” मी आॅडर सोडली.
तो हाॅटेलवाला पाण्याचा जग घेऊन आला.
पलीकडं काही कागद पडले होते. काही खरकट सांडलं होतं.त्याच्या हातात जे ओलं फडकं होतं.त्यानं पुसून घेतलं. सापसूप करून घेतलं.
“सायब पाणी…!!” मी आणि माझ्या मित्रांनी त्याच्याकडं पाहिलं.त्या नजरेत थोडी तुच्छता नि राग होता. गि-हाईक आलं की त्याला पाणी दयावं नंतर आॅर्डर घ्यावी अशी रीतच असते. त्यात रागण्यासारख काय होत ? त्या मघाकडं आम्ही तुच्छ नजरेनं पाहिलं.
“सायब तुम्हाला बिसलरी हवी का ? पण ती माझ्याकडं नाही.समोरून आणून देऊ का ?”
“एवढं मोठं हॉटेल आहे नि बिसलरी नाही? ”
“सायब त्याला फ्रिज पायजे की ”
“मग ठेवायचं की?”
” इथं असं रस्त्यावर…? ” तो हासला आणि पळतचं मेडीकल मध्ये गेला . त्याला कळून चूकलं होतं हे आपली मज्जा घेत आहेत. तो पाण्याची बाटली घेऊन आला. मला देत तो म्हणाला,
“सायब पाणी नाय ठेवत मी पण चहा असा फक्कड बनवतो .”
“स्वच्छता भी पायजे.नुसतं फक्कड नि बिक्कड” काय कामाचा ?” मी उगच उपदेशाचा डोस दिला.असा डोस देण्याची संधी आली तर सहसा मी सोडत नाही. स्वच्छता शब्द एेकल्यावर तो बारिक हासला. तिथं जी माणसं होती. ती घटाघटा पाणी पित. चहा पित.वचावचा खात.मी कुतुहलाने पहात होतो.ते इतकं घाणरेडे खात आहेत. धूळ बसलेले अन्न खात आहेत.इतकं अशुध्द पाणी पित आहेत.यांच्या पोटात इतके विषाणू जात असतील.जंतू जात असतील.यांना कसं काही होत नाही?रोग गरीबांच शरीर निवडत नसतील काय ?
माझा मलाच भाबडा प्रश्न पडला.
आमच्यासाठी स्पेशल चहा बनत होता.तेवढयात तिथं एक कप्पलं आलं. त्यांच्या सोबत त्यांच एक पिल्लू पण होत. त्या गडयाचे केस वाढलेले…विस्कटलेले…थोडे थोडे पिकायला लागलेले.दाढीचं खूट वाढलेले. जीन्स होती पण फाटलेली..मळलेली…त्यानं किमान आठ दिवस तरी अंघोळ केली नसेल.गाल पार चपटे झाले होते. त्याची बायको पण तशीच अवतार उतारलेली होती. तिचं वय तीसच्या आतचं असावं . हिरवट रंगाची साडी.कळकटलेल निळसर रंगाचं पोलकं… ते पण विरलेलं होतं.त्यातून तिचं अंग दिसतं होतं. तिचा ते पदराने झाकण्यासाठी केविलवाणा प्रयत्न चालु होता. . केसाचा झाप झालेला…पायात तुटकी चप्पल…ते लेकरू कडाला. त्याचं अंग मळलेलं…शेंबडाच्या वाळून गेलेल्या रेषा.. ते पण हं ते तिला तोडीत होतं.तिनं तिला पाजलं होत की नाही ? ते भुकेलेले असावं. तिनचं जर काही खाल्ल नसल्ल तर ? ती काय करू शकत होती. बाकी ती सुंदर नाही पण आकर्षक होती. तिची आकर्षकता तिच्या तारूण्यात असावी.तिला पाहिलं की मला जरा कळवळून आलं. ह्रदय माझं कणव पाझरू लागलं. ते सारे आमच्या पुढयात येऊन उभे राहिले.
” ती खिचडी दे एक प्लेट” त्यानं आॅर्डर दिली.
” पैसं आहेत का ?”
” दहा….हायेत ”
“आरं मग …पाच ?”
“देऊ की दादा …. त्यानं विनवणी केली.
“असं रोजचं कमी कसं ?”
” दे दादा …आज देऊ तुझे .लेकरू लयं भुकेल”
हाॅटेलवाल्यांन लगेच एक प्लेट घेतली.खिचडी टाकली.त्यावर हरभरा उसळ टाकली .कांदा कापला.कोंथिबर टाकली तिच्या हातात दिली.
“बस्स..एकचं.तुम्हाला नको का?”
“आम्हाला नको .आज लग्नात जातोय.तिथचं खाऊ .” तिनं सपष्टीकरणं दिलं.
” त्यांना कशाला सांगायचं लग्न बिग्न….”तिनं सपष्टीकरण देणं त्याला आवडलं नव्हतं.
तिथचं झाडाच्या सावलीला बसले. आमचा चहा आला.फुरके मारीत चहाचं पिऊ लागलोत.चहाला भारी चव होती.पाॅश हॉटलात चहात अशी चव नि मज्जा नाही कधी सापडली.
माझं लक्ष त्या कप्पलं कडेचं होतं. ती त्या लहानग्याला भरवित होती.ते लहानग अधाशापणे खात होते. हा तिथचं बसून होता. बोलता बोलता तो एकदा घास तोंडात टाकायचा.तशी ती ओरडायची …त्याच्यावर खेकासायची..
“लेकराला खाऊ दया.” तो नुसता हसायचा. दाताड काढयचा. तो जीभल्या चाटत होता.
तिच्या ही त्वांडाला पाणी सुटलं होतं.ते मी सपष्ट पाहू शकत होतो.मी त्यांच्याकडं पहातचं होतो. तेवढयात तिची नि माझी नजरा नजरा झाली.ती जरा संकोचली. तो फटकाचं पदर तिनं नीट केला. हे मी माझ्या मित्राला दाखवलं. मला त्यांच्याबद्दल प्रंचड सहानुभूती होती .मित्र पण ते दृश्य पाहू लागलं. आम्ही सारे त्यांच्याकडं पहात होतो.तिनं हळूचं तिच्या नव-याला सांगितल असावं .तो जरा सावध बसला.आपल्या दारिद्रायचं प्रदर्शन कुणाला हवं असेल बरं ?
माझ्या एका मित्रांनी ते करूण दृश्य कॅमे-यात बंध करण्याची उत्कट इच्छा झाली .एक बरं होतं.त्याला सेल्फी काढण्याची तीव्र इच्छा झाली नाही. त्यानं मोबाईल काढला नि फोटो काढले. त्यांनी फोटो काढलेले तिला कळले.ती ताडकून उभी राहिली.त्या लहानग्याला भरवण्याचं बंद केल.तिथूनचं ओरडली,” फोटो का काढला काय ? आम्ही काय वेडे वाटलोका ?”
तिला फार राग आला होता. आमची सा-यांची चीड आली होती.
” तुझा नाय फोटो काढला मी” मित्र घाबरून गेला. हासत हासत मागे सरकला. मोबाईल खिशात ठेऊन दिला. उग सुरक्षीत …
ती पुन्हा पलीकडं गेली.त्या लहानग्याला खाऊ घालू लागली. हॉटेलवाला मित्राकडं बघून मुरक्या मुरक्या हासला.
” मी सहज फोटो काढयला गेलो.बाई पार जहाल दिसते बुवा”
” तुम्ही कशाला काढयचा फोटो?”
“उग आपला सहज….”
” गरीबी खूप वाईट असते. ती अशी फुटू नाहीत मावायाची.”
” तसं नाही रे…”
” मग कसं ?”
” ती उपाशी राहते पण भीक नाही मागत. काम करते तेवढचं खाते.तो मात्र पैसा आला का मुत पितो.”
“राहते कुठं ?”
” त्या तिथचं पुलाच्या खाली. सायब तिचं घर संसार… पण लयं इमानी .उधारी नाही ठेवत.”
“पण ती इथं कशाला आली?”
“आली.कुणाला कोणतं भोग दयायचं त्याच्या हातात सायब .ती लय्यं मोठी स्टोरी हाय.”
“लव्ह स्टोरी तर नाही ना ?”
“तसं…चं हाय.” तो खळखळून हासला. सारे हासले. मला हासू नाही आलं.
” मला तर भाऊ मानते.”
” ती तुला भाऊ मानते पण तू मानतो का तिला बहीण…”माझा खोचक प्रश्न.
“मानतो सायब.ती लय्यचं जिद्दी नि खंबीर …”
मला त्याची छाती तिच्या विषयीच्या गर्वानं फुगून आल्यावाणी वाटलं. ती आमच्याकडं पहात होती.
त्यानं तंबाखूचं पुडी काढली. त्यानं घेतली.तिला दिली चिमूटभर… दोघांनी चोळली .तोंडात टाकली. लेकराला कडेला घेतलं. तिनं त्याचा हातहातात घेतला व त्याला अधिकचं बिलगली.आमच्यकडं पाहिलं. विजयी मुद्रेने ती हासत गेली.

— परशुराम सोंडगे,पाटोदा (बीड)
9673400928

Avatar
About परशुराम सोंडगे 11 Articles
परशुराम सोंडगे हे स्तंभलेखक असून बीड येथून प्रसिद्ध होणार्‍या दैनिक सुराज्य, दैनिक चंपावतीप्रत्र वगैरे वृत्तपत्रांतून लेखन करतात. ते “आई गातो तुझी गाणी” हा कविता व कथांचा बहारदार कार्यक्रम सादर करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..