
नाथपंथाविषयी रिसर्च करुन तपशिलवार माहिती यात दिलेली आहे. स्थळ, काळाची सुंदर चित्रे सविस्तर टिपण्यासह नाथपंथ, त्याचे तत्त्वज्ञान सामान्य माणसासाठी तयार केले आहे.
हरिश्र्चंद्रगडाजवळ, सह्याद्री पर्वतास पूर्व दिशेकडे जाणारा एक डोंगरफाटा फुटतो. नगर जिल्ह्यातून जाणार्या या डोंगररांगा बीड व उस्मानाबाद जिल्ह्याच्या आंतरभागापर्यंत पसरलेल्या आहेत. यातील सोनई-बांबरी-जेउर-भिंगार (जि. नगर) ते चिंचोली-येवलवाडी (जि. बीड) या दरम्यानच्या सुमारे ११५ कि. मी. च्या डोंगरपट्ट्यास गर्भगिरी किंवा गर्भाद्रि असे म्हणतात. नवनाथ भक्तिसार या लोकप्रिय पोथीतील २३ व्या अध्यायात नवनाथांच्या गर्भगिरीतील वास्तव्याचे व कार्याचे वर्णन आहे. आदिनाथ शिवाचे वृध्देश्र्वर हे प्राचीन क्षेत्र तसेच मच्छिंद्रनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ व गहिनीनाथ या प्रमुख नाथसिध्दांच्या संजीवन समाध्या यासह अनेक नाथकालीन स्मृतीस्थळांनी हा परिसर गजबजलेला आहे. तीन तालुक्यांच्या भूभागावर इतक्या दाटीने वसलेली नवनाथांची स्थाने भारतात अन्यत्र कोठे अभावानेच असतील.
गर्भगिरीतील नाथपंथ
लेखक : टी. एन. परदेशी
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
मूल्य : २५०/- रुपये
पाने : २०८
Leave a Reply