पाण्याखाली माती असो वा मातीखाली पाणीपीडितांना चालावे लागे नेहमीच अनवाणीधनिकांना मिले सदा पुरण-पोळीनसे नशिबी गरिबांच्या साडी चोळी ||१|| पैसा जाई सदा पैशाकडे अन्नासाठी दारोदार गरिबांचे रोज साकडे दीनदलितांची सदा उपेक्षा चोरभामट्यांची नियमित रक्षा ||२||अर्धपोटी कुणी,नुसता उपाशीरस्त्यावर झोपतो कोणी भिंतीपाशीचंद्रमौळी झोपडीला महालाचे लेणेअसंख्य
बळी जाती असाध्य रोगाने ||३|| उन,वारा,थंडी यांची नाही तमा जन्मभर साथ देतो बहुतेकांना दमा बालमजुरांचे नशिबी कुणा जीणे खळगी भरण्या पोटाची रक्तही पडे उणे ||४||भ्रष्टाचारी पुढारी आश्वासने देतीगरजेच्या वस्तूंवर कर वाढविती’ विषमता नष्ट करू ‘ सांगे अभिमानेहप्तावसुली सदा करी दंडुक्याने रंजल्या गांजल्यांची बहुरंगी दैना ‘हाक’ पीडितांची देवही एकेन…!!! ||५||
* कविता * नरेंद्र श्रावणजी लोहबरे
— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
Leave a Reply