हा एक सत्य घटनेवर आधारित प्रसंग गोविंदमामा हे खऱ्या अर्थाने गांवमामा झालेले होते. शिकलेले आणि तडफदार व्यक्तिमत्व. अतिशय प्रेमळ स्वभाव आणि त्यागवृत्ती. कुणीही समोरच्या व्यक्तीबद्दल आदरभाव, मदत करण्याची आंतरिक इच्छा आणि सदैव हासत आनंदी स्वभाव. सर्वच सदगुणांचे मिश्रण क्वचितच एका व्यक्तीच्या अंगी सापडणे सहसा कठीण. म्हणूनच त्यांना आपल्या वागनुकीने सर्व समाज अर्थात ते रहात असलेले खेडेगांव गोविंदमामा ह्या टोपण नावानी संबोधित असे. स्वतःचे घर व कांही एकर जमीन होती. मुलगा व पत्नी जानकीबाई एवढाच परिवार. लहान कुटुंब व सुखी कुटुंब ह्या व्याख्येमध्ये सीमित.शेती हा प्रमुख व्यवसाय होता. गांवातील लहान सहान कामे करून पैसे मिळत ते मिळवीत. मुलगा मोठा झाला. शहारांत जाऊन वेगळा व्यवसाय करू लागला. शेती करण्यात त्याला न रुची ना सवड. लग्न झाल स्वत: चा वेगळाच संसार शहरामध्ये थाटला. आधुनिकतेमध्ये जाण्यात आनंद घेत असे ज्या गोष्टी खेड्यात त्याला मिळत नव्हत्या त्या सर्व शहरी जीवनात मुबलक मिळू लागल्या. त्याला दोन मुले झाली. गोविंद मामा व जानकीबाई दोघेच खेड्यात रहात होते. सर्व गावाला भूषण असलेले व सतत आनंद देणारे गोविंदमामा गांव मंडळीना उत्तम संस्कार देण्यात यशस्वी झाले. परंतु आपल्या स्वता:च्या मुलाला आपुलकी व सह जीवनाचा पाठ शिकऊ शकले नाही. तो अलिप्त रहाण्यात समाधान मानीत होता.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर