नवीन लेखन...

गुणसंपन्न बोर

शास्त्रीय नाव : Ziziphus mauritiana / Ziziphus jujube

इंग्रजी नाव : Jujube / red date

स्थानिक नाव : बोर

बोर सर्वांच्याच परिचयाचे असते. मात्र त्याचे झाड फारच कमी लोकांनी पाहिलेले असते. झुडुपवजा दिसणारे हे झाड काही ठिकाणी १० मीटरपर्यंत उंच वाढलेले दिसून येते. माळरानावर दिसणारे हे झाड पानगळीच्या वनात देखील दिसते.

बोराचे शास्त्रीय नाव Ziziphus mauritiana / Ziziphus jujube असे आहे. बोराच्या झाडासारखे दिसणारे तोरण (वेल) हे आर्द्र पानगळीच्या निमसदाहरित झाडासारखे वनात दिसून येते. जंगलात गेल्यावर बोर हे झाड ओळखायचे असेल तर त्याची वरुन हिरवी असलेली आणि खालच्या बाजूने पांढरट चंदेरी रंग असलेली पाने ही उपयुक्त खूण ठरु शकते. पानाला मुख्य तीन शिरा ठळकपणे दिसतात. पानाजवळ छोटे काटे असतात. क्वचित जोडीने येणारे काटे कधी कधी वळलेले असतात. त्यामुळे शेळ्यांना पाने खायला अडथळा येऊ शकतो.

पिवळसर पांढर्‍या बारक्या (२-४ सेंमी) फुलांमुळे पावसाळ्यात हे झाड काटेरी असूनदेखील अतिशय आकर्षक दिसते. बर्‍याचवेळा फूले फूलण्याचा काळ भौगोलिक परिस्थितीमुळे थोडा बदललेला दिसतो. बोराची फळे गोलसर असतात. पिकल्यावर ती पिवळ्या-गडद बदामी रंगाची दिसतात. बोराच्या झाडावर छोट्या पिवळ्या, राखाडी चिमण्यांची घरटी दिसून येतात. पहीरीच्या काठावर असणार्‍या बोराच्या झाडावर १०-१५ च्या संख्येने सुगरणीची घरटी आढळून येतात. झाडांच्या पानावर कॉमन पिरो, कॉमन सिल्व्हरलाईन फुलपाखराच्या अळ्या आढळून येतात.

पक्षी, फुलपाखरांकरीता उपयुक्त असणार्‍या या झाडाच्या लाकडाचा उपयोग ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारची अवजारे बनविण्याकरीता केला जातो. जळाऊ लाकूड म्हणून तर सर्रास उपयोग केला जातो. आयुर्वेदात बोराचे मूळ, फळ, फुलं, औषधे बनविण्याकरीता वापरले जाते. फळे पौष्टिक असून त्यापासून चविष्ट लोणचे करता येते.

शुष्क प्रदेशात कोरड्या पडीक जमिनीवर या झाडाचा वनीकरणासाठी विचार होणे आवश्यक आहे. बचतगटाकरीता बोराची फळे गोळा करणे व ती विकणे हा चांगला व्यवसाय ठरु शकतो.

(पर्यावरण दक्षता मंचच्या `आपले पर्यावरण’ या नियतकालिकातून साभार)

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..