एक गमतीदार परंतु मनोरंजक संत कथा वाचण्यांत आली. जीवनाचे खुपसे तत्वज्ञान कळले. सारे चिंतनीय होते. एका गावांत एक थोर संत रहात होते. तत्वज्ञानी व अध्यात्मिक क्षेत्रांत नावाजलेले. दुरदृष्टी, सत्य संवाद, आणि भविष्याचा अचूक वेध ह्यामध्ये मान्यताप्राप्त. सभोवताली अनेक शिष्यगण सदैव असत. गुरुना ते देवाप्रमाणे समजत.
सर्व शिष्यगण अत्यंत गंभीरतेने व आश्चर्याने गुरुंचे विधान ऐकत होते. सर्वांनी गुरुंच्या त्या विलक्षण आज्ञाची नोंद घेतली. गुरु आध्यात्मिक दृष्टे व महान भविष्यवेत्ते होते. त्यांच्या वाणीप्रमाणेच घडले.
एका घाणेरड्या उकीरड्यावर, गटाराच्या शेजारी कांही डूकरे स्वतःचे अन्न शोधीत होती. त्यांत वर्णन केलेले डुक्कर देखील होते. सर्व शिष्यगण हाती काठ्या, लाठ्या घेऊन एकत्र जमा झाले. त्यानी त्याच डुकराला घेरले. ते तथाकथीत डुक्कर सैरा वैरा धावू लागले. आपल्यापरी आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करु लागले. सर्व शिष्यगण त्याच्यावर घाव घालणार, इतक्यांत चमत्कार झाला. ते डुक्कर मधोमध शांत उभे राहीले. आणि त्याच्या तोंडून मानवी शब्द बाहेर पडले. त्यांच्या गुरुचाच आवाज स्पष्टपणे ऐकू येवू लागला.
״ थांबा । माझ्या प्रिय शिष्यानो. मला मारु नका. मीच तुम्हास पूर्वी माझ्या, आजच्या जन्म चक्राबद्दल सांगितले होते. हे चक्र खंडीत करण्यास सुचविले होते. हे सत्य आहे. पण थांबा. आता पुन्हा ऐका. मी तुमचाच गुरु. आज अत्यंत वेगळ्या आवस्थेत आहे. एका डुक्कराच्या योनीत, जीला मानवानी हिनत्व देत दुर्लक्षीत केले. स्वच्छ-अस्वच्छतेच्या मोजमापांत अत्यंत घाणेरडा ठरविले. मी माझ्या पूर्व मानवी योनीत, मानवाच्या तथाकथीत श्रेष्ठत्व, महानता, विद्वत्ता ह्यांचा पुरेपुर अनुभव घेतला आहे. मानवाने इतर सर्व सजीव योनींचे ज्ञान व विश्लेशण ह्यांच्या साह्याने भरपुर माहीती मिळवली. ज्ञान तर मिळत गेले, परंतु अनुभवाचे काय ? कारण अनुभव हा ज्ञानानी मिळत नसतो. अनुभवासाठी निसर्गच्या दैनंदीन चक्रातुनच जावे लागते. क्षणा क्षणाची घटना जीवनाची अनुभव संपन्नता देते. आणि विशेष म्हणजे प्रत्येक घटना भिन्न तसाच अनुभव देखील. ज्ञान घटनांचे विश्लेशन करते. घटनांची जाणीव फक्त अनुभवच देऊ शकतात. त्या घटनांच्या छेदातून आरपार गेल्यानंतरच. म्हणून अनुभव ही वैयक्तीक बाब बनते. अनुभव हे ज्ञान देते मात्र ज्ञान अनुभव देऊ शकत नाही.
״ ईश्वराची, निसर्गाची श्रेष्ठता हिच आहे की त्याने जीवन चक्रातील प्रमुख बाबी सर्व जीवाना त्याच पद्धतीने, क्षमतेने देऊ केलेत. स्वतःच्या जीवाविषयी प्रचंड प्रेम, जगण्याची उत्कंठ इच्छा, अस्तित्वासाठी झगडा, जीवाची वाढ, पुनुरुत्पादनता, आणि संरक्षण इत्यादी मुलभूत बाबी प्रत्येक सजीव प्राण्यांत तशाच दिलेल्या आहेत. ‘मी’ वर प्रेम म्हणजे त्याच्यातील ईश्वरी अंशावर प्रेम असते. मग ते कोणत्याही स्वरुपांत वा योनीत असो. माणसाला विचाराने समज आली. इतर सजीवांना ” हे ज्ञान ” कसे असावे हे ज्ञात नाही. माणसे विचारांनी तुलनात्मक बऱ्यावाईट, सोय-गैरसोय, सहजता वा कष्टमय जीवन ह्याची फक्त चर्चाच करतात. प्रत्याकाला चांगले व सुकर जीवन हवे. परंतु हाती मिळालेले जीवन नष्ट करुन, इतर अनिश्चित जीवनाचा कुणीच स्विकार करणार नाही. हा निसर्ग असतो. जीवनाची सारी प्रमेये मला देखील लागु पडतात. माझे हे जीवन अस्तित्व नष्ट करुन मी भावी अनिश्चिततेत जावू इच्छीत नाही. तुमचे गुरु म्हणून माझा आदेश आहे की मला लाभलेले आजचे जीवन, निसर्गचक्रानुसार पुरे करु द्या. मला जगु द्या आणि परत जा. ״
सारे शिष्यगण अचंबीत झाले. त्यानी हातातल्या काठ्या लाठ्या फेकून दिल्या. त्या योनीतील समोरच्या गुरुला विनम्र अभिवादन केले. सारे आनंदीत होते. कारण त्याना गुरुकडून आज जीवनाचे एक वेगळेच तत्वज्ञान कळले होते.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
Leave a Reply