
१९६८ साली प्रदर्शित झालेल्या धर्मकन्या या चित्रपटातील हे गीत. या गाण्याचे गीतकार होते पी. सावळाराम. उषा मंगेशकर आणि कृष्णा कल्ले यांनी या गीताला आपला आवाज दिला. संगीतकार होते पंडित ह्रदयनाथ मंगेशकर.
गोड गोजरी, लाज लाजरी ताई तू होणार नवरी
फुलाफुलांच्या बांधून माळा मंडप घाला ग दारी
करकमलांच्या देठावरती चुडा पाचुचा वाजे
हळदीहुनही पिवळा बाले रंग तुला तो साजे
नथणी बुगडी लाजे, रूप पाहुनी तुझे, बांधू ताई मणि-मंगळ-सरी
भरजरी शालू नेसूनी झाली, ताई आमुची गौरी
लग्न-मंडपी तिच्या समोरी, उभी तिकडची स्वारी
अंतरपाट सरे, शिवा पार्वती वरे, लाडकी ही, जाई ताई दूरी
—
Leave a Reply